BS-6 इंजिनसह ‘वॅग्नार’चे सीएनजी व्हर्जन लाँच

कार कंपनी मारुती सुझुकीने बीएस-6 इंजिनसह आपली लोकप्रिय कार वॅग्नार लाँच केली आहे. ही कार सीएनजी व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आली असून, याची किंमत 5.32 लाख रुपये आहे. हे कार केवळ एलएक्सआय या मॉडेलमध्येच लाँच करण्यात आले आहे. कंपनीचे हे तिसरे मॉडेल आहे, जे एस-सीएनजी टेक्नोलॉजीसह लाँच करण्यात आलेले आहे.

Image Credited – India TV

वॅग्नार सीएनजी मॉडेल 1.0 लीटर, थ्री सिलेंडर पेट्रोल इंजिनसह येते. जे सीएनजीसह 58 बीएचपी पॉवर आणि 78 एनएम टॉर्क निर्माण करते. तर पेट्रोल मोडसह 81बीएचपी पॉवर आणि 113 एनएम टॉर्क निर्माण करते.  कारचे एस-सीएनजी व्हर्जन 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससोबत येते. ही कार इलेक्ट्रॉनिक कंट्रोल यूनिट्स आणि इंटेलिजेंट इंजेक्शन सिस्टमसह येते.

Image Credited – Jagran

एस-सीएनजी टेक्नोलॉजीसह येणारी कंपनीची ही तिसरी कार आहे. याआधी ऑल्टो 800 आणि आर्टिगा एमपीव्हीमध्ये ही टेक्नोलॉजी देण्यात आली होती.

Leave a Comment