निजामाचा 70 वर्ष जुना खजिना झाला भारताचा

हैदराबादच्या निजामाच्या पैशांसंबधित गेली 70 वर्षांपासून सुरू असलेल्या प्रकरणाचा अखेर निर्णय आला आहे. लंडनच्या एका बँकेत गेली अनेक दशकांपासून कोट्यावधी रुपये अडकलेले होते. आता ब्रिटनमध्ये भारतीय दुतावासाला आपला हिस्सा मिळणार आहे. या व्यतरिक्त पाकिस्तानला देखील भारताला 26 कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. ही रक्कम भारताकडून ही केस लढवण्यासाठी खर्च झालेल्या रक्कमेच्या 65 टक्के आहे.

लंडनमधील अधिकाऱ्यांनी सांगितले की, ब्रिटनमध्ये भारतीय दुतावासाला 35 मिलियन पाउंड (325 कोटी रुपये) आपला हिस्सा म्हणून मिळणार आहेत. ही रक्कम 20 सप्टेंबर 1948 पासून इंग्लंडमधील नॅशनल वेस्टमिंटर बँकेतील अकाउंटमध्ये अडकलेली होती. पाकिस्तानने देखील या पैशावर आपला हक्क सांगितला होता.

मागील वर्षी ऑक्टोंबरमध्ये न्यायालयने भारत आणि हैदराबादचा आठवा निजाम मुकर्रम जाहच्या बाजूने निर्णय दिला होता. मुकर्रम आणि त्याचा भाऊ मागील 6 वर्षांपासून लंडनच्या न्यायालयात पाकिस्तान विरोधात केस लढवत आहेत.

याशिवाय हा खटला लढवण्यासाठी भारताला आलेल्या खर्चाच्या 65 टक्के रक्कम (जवळपास 26 कोटी रुपये) पाकिस्तानने भारताला दिले आहेत. इतर रक्कमेविषयी चर्चा सुरू आहे.  भारतीय दुतावासाला मिळालेली रक्कम लवकरच दिल्लीला पाठवण्यात येणार आहे.

काय आहे प्रकरण ?

20 सप्टेंबर 1948 ला हैदराबाद निजामचे अर्थमंत्र्याने ब्रिटनमध्ये पाकचे उच्चायुक्त राहिलेले हबीब इब्राहिम रहीमटोला यांच्या बँक खात्यात 1 मिलियन पाउंड जमा केले होते. तेव्हापासून बँक खात्यात जमा केलेली रक्कम वाढून 35 मिलियन डॉलर झाली आहे. भारताने या पैशावर दावा करताना सांगितले की, 1965 मध्ये निजामाने हा पैसा भारताला दिला होता.

Leave a Comment