किआ मोटर्स लाँच करणार नवीन एसयूव्ही ‘सोनेट’

किआ मोटर्सने ऑटो एक्स्पो 2020 मध्ये आपली नवीन कॉन्सेप्ट एसयूव्ही सोनेटला सादर केले होते. कंपनी लवकरच आपली ही नवीन एसयूव्ही लाँच करणार आहे.

रिपोर्टनुसार, किआ सोनेट कॉन्सेप्ट एसयूव्ही ऑगस्टमध्ये लाँच करणार आहे. मागील वर्षी ऑगस्टमध्ये कंपनीने किआ सेल्टॉसला लाँच करत भारतीय बाजारात पदार्पण केले होते. त्यामुळे कंपनीला एक वर्ष होणार असल्याने या निमित्ताने किआ सोनेट लाँच करण्यात येणार आहे.

Image Credited – Amaarujala

किआ सोनेट एसयूव्हीमध्ये 1.0 लीटर टर्बो पेट्रोल इंजिनमध्ये डीसीटी आणि मॅन्युअल ट्रांसमिशन मिळेल. तर 1.2 लीटर इंजिनसोबत इंटेलिजेंट मॅन्युअल ट्रांसमिशन आणि डिझेल इंजिनमध्ये 6 स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रांसमिशन मिळेल.

Image Credited – GoMechanic

या सेगमेंटमध्ये किआ सोनेट ब्रेझा, वेन्यू आणि नेक्सॉन आणि महिंद्राच्या एक्सयूव्ही300 ला टक्कर देईल. या नवीन एसयूव्हीची किंमत 7 ते 12 लाख रुपये असण्याची शक्यता आहे. यासोबत किआ मोटर्स भारतीय बाजारात मि-साइज एमपीव्ही देखील लाँच करण्याची देखील योजना बनवत आहे.

Leave a Comment