केजरीवाल दहशतवादी असल्याचा उल्लेख मी कधीही केला नाही


पुणे – केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत बोलताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे दहशतवादी असून त्यांच्याविरुद्ध आपल्याकडे पुरावे असल्याचा उल्लेख आपण कधीच केला नसल्याचा खुलासा केला. दिल्लीमध्ये काँग्रेस लुप्त झाल्याने भाजप आणि आम आदमी पक्षामध्ये सरळ लढत झाल्यामुळे आमचा पराभव झाल्याचेही त्यांनी सांगितले.

त्यांनी ही माहिती पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयात ‘दिशा’ अंतर्गत विकासकामांचा आढावा घेतल्यानंतर पत्रकार परिषदेत दिली. जावडेकर म्हणाले, दिल्लीमध्ये काँग्रेस लुप्त झाल्यानंतर काँग्रेसची मते कोणत्या पक्षाकडे गेली हे माहीत नाही. भाजप हा शिकणारा पक्ष असून, या पराभवातून आम्ही नक्कीच शिकणार आहोत. ‘गोली मारो’ आणि ‘भारत पाक’ ही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेली विधाने भोवल्याचे निरीक्षण नोंदवले आहे. याबाबत विचारले असता ते म्हणाले, या कारणांबरोबरच इतरही काही कारणे आहेत.

Leave a Comment