यामुळे 14 फेब्रुवारीला साजरा केला जातो व्हेलेंटाइन डे

दरवर्षी 14 फेब्रुवारीला जगभरात ‘प्रेमाचा दिवस’ अर्थात ‘व्हेलेंटाइन डे’ साजरा केला जातो. अनेक लोक या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतात. 7 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारीपर्यंत ‘व्हेलेंटाइन आठवडा’ देखील चालतो. मात्र प्रत्येक गोष्ट साजरी करण्यामागे एक इतिहास असतो. व्हेलेंटाइन डे मागे देखील इतिहास आहे. याबद्दल जाणून घ्या.

ईसवी 270 मध्ये रोमन साम्राज्यात क्लाउडियस गोथिकस द्वितीय नावाचा एक राजा होता. हा राजा प्रेम संबंध आणि लग्नाच्या बाबतीत एकदम कठोर होता. त्याचे म्हणणे होते की प्रेम अथवा लग्नामुळे सैनिक आपले लक्ष्य विसरतात व युद्धात पराभव स्विकारतात. त्यामुळे त्याने सैनिकांना विवाह करण्यावर बंदी घातली. मात्र त्याच्याच राज्यातील व्हेलेंटाइन नावाच्या एका संताने याला विरोध केला.

क्लाउडियसने संत व्हेलेंटाइनला मृत्यूदंड दिला. असे मानले जाते की, ज्या दिवशी संत व्हेलेंटाइनला मृत्यूदंड देण्यात आला, तो दिवस 14 फेब्रुवारी होता. तेव्हापासूनच या दिवशी 14 फेब्रुवारीला व्हेलेंटाइन डे साजरा करण्याची प्रथा पडत गेली.

काही इतिहासकारांचे म्हणणे आहे की, व्हेलेंटाइनला कारागृहात बंदी बनविण्यात आले होते. त्याने जेलरच्या मुलीला पत्र लिहिले. ती मुलगी संत व्हेलेंटाइनचा आदर करत असे. या पत्राच्या शेवटी, ‘फ्रॉम योर व्हेलेंटाइन’ असे लिहिले होते.

एक मत असेही आहे की, सन 496 मध्ये पहिला व्हेलेंटाइन दिवस साजरा करण्यात आला. रोमन फेस्टिव्हलद्वारे व्हेलेंटाइन डे ची सुरुवात झाली होती, असे मानणारा देखील एक प्रवाह आहे. पोप गेलॅसियसने 14 फेब्रुवारीला सेंट व्हेलेंटाइन डे घोषित केला होता. रोमचे नागरिक लुपर्केलिया नावाचा एक सण फेब्रुवारीमध्ये साजरा करत असे. यावेळी सामुहिक विवाह पार पडतात.

Leave a Comment