या अ‍ॅप्सच्या माध्यमातून होत आहे तुमची हेरगिरी

गुगल प्ले स्टोरवर पुन्हा एकदा अशा 24 अ‍ॅप्सची ओळख करण्यात आली आहे, ज्याद्वारे युजर्सची हेरगिरी करण्यात येत होती. व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क सर्व्हिस प्रोव्हाईडर ‘व्हीपीएन प्रो’ नावाच्या कंपनीने या धोकादायक अ‍ॅप्सच्या नावाचा खुलासा केला आहे.

गुगलने आपल्या प्ले स्टोरवरून हे सर्व अ‍ॅप्स हटवले आहेत. मात्र हे अ‍ॅप्स तुमच्या फोनमध्ये असण्याची शक्यता आहे. या अ‍ॅप्सला 38.2 कोटीवेळा डाउनलोड करण्यात आलेले आहे.

हे अ‍ॅप्सला युजर्सची परवानगी न घेता डिव्हाईसच्या कॅमेरा आणि गॅलरीचे परमिशन घेतात. यातील अनेक अ‍ॅप्स आपोआप कोणालाही फोन लावतात. तर काही अ‍ॅप्स आपोआपच व्हिडीओ आणि ऑडिओ रेकॉर्ड करतात.

यामध्ये World Zoo, Word Crush, Word Crossy, Weather Forecast, Virus Cleaner 2019, Turbo Power, Super Cleaner, Super Battery, Sound Recorder, Soccer Pinball, Puzzle Box, Private Browser, Net Master, Music Roam, Laser Breaker, Joy Launcher,Hi VPN, Free VPN, Hi VPN Pro, Hi Securities 2019, File Manager,Dig it,Candy Selfie Camera,Candy Gallery,Calendar Lite या अ‍ॅप्सचा समावेश असून, यापैकी जर कोणतेही अ‍ॅप तुमच्या फोनमध्ये असेल तर त्वरित डिलीट करा.

Leave a Comment