‘टेरी’चे माजी प्रमुख आर. के. पचौरी यांचे निधन


नवी दिल्ली – दिल्लीतील एका रुग्णालयात माजी टेरी (TERI) प्रमुख आर.के.पचौरी यांचे निधन झाले आहे. पचौरी हे नामवंत पर्यावरणवादी आणि ‘द एनर्जी अँड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट’चे प्रमुख होते. त्यांना हृदयासंबंधी तक्रारीनंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. टेरीकडून पचौरी यांच्या निधनानंतर एक संदेश जारी करण्यात आला. हे सांगताना आम्हाला दु:ख होत आहे की, डॉ. पचौरी यांचे निधन झाले आहे. संपूर्ण टेरी टीम त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहे, असे ‘टेरी’ने म्हटले आहे.

टेरी आज जे काही आहे, ते केवळ डॉ. पचौरी यांच्यामुळेच आहे. पचौरींनी संस्थेला मोठे करण्यासाठी अथक परिश्रम केले, अशी भावना टेरीचे डायरेक्टर जनरल डॉ. अजय माथूर यांनी व्यक्त केली. पचौरी यांच्याकडून २०१५ साली टेरीचा कार्यभार माथूर यांच्याकडे सोपवला गेला होता. पचौरी यांच्यावर एका महिला सहकाऱ्याने लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. यानंतर पचौरी यांना पदावरून पायउतार व्हावे लागले.

Leave a Comment