ही आहेत हजारो वर्षांपुर्वींची जगातील सर्वात जुनी शहर

जगभरात अशी अनेक शहर आहेत, जी हजारो वर्षांपासून अस्तित्वात आहेत. या ठिकाणी हजारो वर्षांपुर्वी देखील लोक राहत होती. आज अशाच काही शहरांबद्दल जाणून घेऊया, ज्यांचे अस्तित्व 5 हजार ते 11 हजार वर्ष जुने आहे. ही शहर जेवढी जुनी आहेत, तेवढीच सुंदर देखील आहेत.

Image Credited – Amarujala

जेरिको –

पॅलेस्टाईनमधील जेरिको शहराला जगातील सर्वात जुन्या शहरा पैकी एक म्हणून ओळखले जाते. ऐतिहासिक कागदपत्रांनुसार, हे शहर 11 हजार वर्ष जुने आहे. सध्या या प्राचीन शहराच्या ठिकाणी 20 हजार लोकांची वस्ती आहे.

Image Credited – Amarujala

बाइब्लोस –

लेबनानचे बाइब्लोस हे शहर जवळपास 7 हजार वर्ष जुने असल्याचा दावा केला जातो. येथे 12व्या शतकात उभारण्यात आलेले अनेक प्राचीन मंदिर आणि किल्ले आहेत, जे पाहण्यासाठी जगभरातून लोक येतात. ये शहर लेबनानच्या प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक आहे.

Image Credited – Amarujala

अ‍ॅलेप्पो –

सीरियातील अ‍ॅलेप्पो शहरला दहशतवादी संघटना आयएसआयएसचा गड म्हणून ओळखले जाते. मात्र हे जगातील सर्वात जुन्या शहरांपैकी एक आहे. हे शहर 6700 वर्ष जुने असल्याचे सांगितले जाते. हे शहर प्राचीन काळापासूनच आशिया आणि युरोपमधील व्यापाराचे महत्त्वपुर्ण केंद्र आहे.

Image Credited – Amarujala

दमिश्क –

सीरियामधील आणखी एक प्राचीन शहर म्हणजे दमिश्क. हे शहर 6300 वर्षांपुर्वी अस्तित्वात आल्याचे सांगितले जाते.

Image Credited – Amarujala

वाराणसी –

भारतातील वाराणसी हे शहर देखील जगातील सर्वात जुन्या शहरांपैकी एक आहे. या शहराला बनारस आणि काशी नावाने देखील ओळखले जाते. प्राचीन हिंदू ग्रंथांनुसार हे शहर लाखो वर्ष जुने आहे. मात्र इतिहासकार हे शहर 5 हाजर वर्ष जुने असल्याचे सांगतात. हे शहर भारतातील प्रमुख धार्मिक स्थळांपैकी एक आहे.

Leave a Comment