सलमानला भेटण्यासाठी या व्यक्तीने सायकलने केला 600 किमी प्रवास

आपल्या आवडत्या स्टारला भेटण्यासाठी चाहते कोणतीही सीमा तोडून येऊ शकतात. याची नुकतीच प्रचिती आसाममध्ये पाहायला मिळाली आहे. यंदा फिल्मफेअर पुरस्कार सोहळा मुंबईच्या ऐवजी आसामच्या गुवाहाटी येथे पार पडणार आहे. 15 आणि 16 फेब्रुवारीला हा कार्यक्रम पार पडणार असून, विजेत्यांच्या नावाची घोषणा आधीच झाली आहे.

या सोहळ्याला बॉलिवुडच्या अनेक कलाकारांसह अभिनेता सलमान खान देखील उपस्थित राहणार आहे. सलमानला भेटता यावे यासाठी एक 52 वर्षीय चाहता तब्बल 600 किमी प्रवास सायकलवरून करत त्याला भेटण्यासाठी गुवाहाटीला आला आहे.

तिनसुकिया जिल्ह्याच्या जगुन येथे राहणारे भूपेन लिक्सन यांनी 8 फेब्रुवारीला सायकलद्वारे आपला प्रवास सुरू केला होता. 6 दिवसानंतर ते 13 फेब्रुवारीला गुवाहाटीला पोहचले. ते आपल्यासोबत सलमान खानचा एक फोटो देखील घेऊन आले आहेत.

वर्ष 2013 मध्ये भुपेन यांनी सायकलचे हँडल न पकडता एका तासात 48 किमीचा प्रवास केला होता. या कामगिरीसाठी त्यांच्या नावाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये देखील आहे.

Leave a Comment