या ठिकाणी सापडले कार एवढ्या भल्यामोठ्या कासवाचे जीवाश्म

दक्षिण अमेरिकेच्या कोलंबिया येथील ताताकोआ वाळवंटात आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या कासवां पैकी एका कासवाचे जीवाश्म आढळले आहेत. वैज्ञानिकांना कार एवढ्या कारच्या आकाराचे कासवाचे जीवाश्म आढळले आहेत. दावा करण्यात येत आहे की, या कासवाची लांबी 13 फूट आणि वजन 2.5 टन एवढे आहे. हे कासव उत्तर-दक्षिण अमेरिकेत 1.3 कोटी वर्ष आधी अस्तित्वात नाही.

या जीवाश्मांना स्टुपेंडेमी जिग्राफीक्स नाव देण्यात आलेले आहे. नर स्टेपेंडेमी कासवाच्या कवचच्या समोर बाजूस शिंग असायचे. ज्याचा वापर ते दुसऱ्या जीवांपासून आपले क्षेत्र वाचवण्यासाठी आणि मादा कासवासाठी लढाईसाठी करत असण्याची शक्यता आहे. बोगोटाचे जीवाश्म वैज्ञानिक एडव्हिन कॅडेना यांच्यानुसार, आज देखील नर कासवांमध्ये लढाई पाहायला मिळते. कॅडेनाच या संशोधनाचे नेतृत्व करत असून, यासंबंधीत माहित जर्नल सायन्समध्ये प्रकाशित झाली आहे.

Image Credited – Bhaskar

वैज्ञानिकांनुसार, सीगोइंग आर्कीलोन यांच्यानंतर स्टुपेंडेमी जिग्राफीक्स जगातील सगळ्यात मोठा कासव आहे. सीगोइंग आर्कीलोन हे डायनॉसोरच्या काळात जवळपास 7 कोटी वर्षांपुर्वी पृथ्वीवर अस्तित्वात होते. त्यांची लांबी 4.6 मीटर होती.

स्टुपेंडेमीचे सर्वात पहिले जीवाश्म 1970 मध्ये सापडले होते. आता सापडलेल्या कासवाच्या कवचची लांबी 2.86 मीटर आहे. हे आर्कीलोन कासवामध्ये आढळले त्यापेक्षा मोठे आहे. याशिवाय खालील जबडा देखील सापडला असून, यामुळे त्यांच्या आहाराबद्दल देखील माहिती मिळते.

Leave a Comment