ब्रिटनची आर्थिक धुरा भारतवंशीय ऋषी सुनक यांच्या हाती


फोटो सौजन्य हिंदुस्तान टाईम्स
ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी गुरुवारी त्यांच्या मंत्रिमंडळात नवीन अर्थमंत्री म्हणून भारतवंशी ऋषी सुनक यांची नियुक्ती केली असून सुनक इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांचे जावई आहेत. सुनक जॉन्सन मंत्रिमंडळात भारतीय वंशाचे दुसरे मोठे मंत्री बनले असून या मंत्रिमंडळात प्रीती पटेल गृहमंत्री आहेत. यापूर्वी अर्थमंत्रीपदाची धुरा पाकिस्तानी वंशाचे साजिद जावेद यांच्या कडे होती मात्र ब्रेग्झीट नंतर त्यांनी या मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता.

डिसेंबरमध्ये ब्रिटनच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या त्यात जॉन्सन यांच्या नेतृत्वाखालील कॉन्झर्वेटीव्ह पार्टीने प्रचंड यश मिळवून पुन्हा सत्ता हस्तगत केली. त्यानंतर जॉन्सन यांनी मंत्रिमंडळात मोठे बदल केले. ३९ वर्षीय ऋषी सुनक याना खासदार बनून अजून पाच वर्षे झालेली नाहीत. राजकारणात येण्यापूर्वी ते गोल्डमन सॅशचे बँकर होते. जगातील पाचवी बडी अर्थव्यवस्था असलेल्या देशासाठी पायाभूत सुविधा, पोलीस, आरोग्य, शिक्षण या क्षेत्रावर खर्च करून त्यात बदल घडवेल असा अर्थमंत्री जॉन्सन याना हवा होता आणि ऋषी ही अपेक्षा पूर्ण करतील असे सांगितले जात आहे.

Leave a Comment