इटली मध्ये मृत्युदरापेक्षा जन्मदर कमी, ७८ वर्षीय पंतप्रधान चिंतेत


फोटो सौजन्य सीबीसी पोडकास्ट
इटलीचे ७८ वर्षीय पंतप्रधान सेर्जिओ मत्तारेल्ला यांनी देशाच्या घटत्या लोकसंख्येबद्दल चिंता व्यक्त केली असून देशाचे भवितव्य संकटात असल्याचे म्हटले आहे. इटलीत जन्मदर सतत घसरत आहे तर मृत्युदरात वाढ होत आहे. २०१९ मध्ये सलग पाचव्या वर्षी राष्ट्रीय सांखिकी संस्था आयस्टेटने जाहीर केलेली आकडेवारी पुरेशी बोलकी आहे.

या आकडेवारीनुसार २०१९ मध्ये इटलीत ४.३५ लाख बाळे जन्माला आली असून ही संख्या गतवर्षीपेक्षा पाच हजाराने कमी आहे. याच काळात ७.४७ लाख लोक मरण पावले असून ही संख्या १४ हजारांनी जास्त आहे. पहिल्या महायुद्धनंतर प्रथमच जन्मदरात इतकी घट झाली आहे आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेसाठी ही परिस्थिती धोकादायक मानली जात आहे.

नवीन जन्माला येणाऱ्या बाळांच्या तुलनेत वृद्ध संख्या वाढती असून देशाची एकूण लोकसंख्या ६.३ कोटी आहे. त्यात देश सोडून जाणाऱ्यांची भर पडते आहे तर काही लोक स्थलांतर करून देशात येत आहेत. १९५१ ते ६९ या काळात देशात जन्मदर स्थिर होता. देशाचे आजचे सरासरी वय ४५.७ असून महिलांचे सरासरी आयुष्य ८५.३ तर पुरुषांचे ८१ वर्षे आहे. कमी उत्पन्न गटातील लोकांनी अधिक संख्येने मुले जन्माला घालावी म्हणून सरकार प्रोत्साहन भत्ते देत आहे.

Leave a Comment