मेट्रोमध्ये साजरे करा वाढदिवस, प्री वेडिंग शुटींग


फोटो सौजन्य इंडिया टाईम्स
विवाह, वाढदिवस असे काही खास प्रसंग यादगार बनविण्यासाठी खास डेस्टिनेशन गाठण्याची पद्धत रुळू लागली असतानाच मेट्रो रेल कार्पोरेशनने एक नवी सुविधा सुरु केली आहे. जयपूर मेट्रो पाठोपाठ आता नॉईडा मेट्रो अॅक्वा लाईनवर ही सुविधा पुरविली जाणार असून त्यात मेट्रो कोच मध्ये वाढदिवस, प्री वेडिंग शुटींग सारखे कार्यक्रम साजरे करता येणार आहेत. इंडियन एक्सप्रेसने या संदर्भात दिलेल्या बातमीनुसार असे कार्यक्रम सादर करताना तासांवर भाडे आकारणी केली जाणार आहे.

मेट्रो कोचचे बुकिंग कन्फर्म झाल्यावर ५ ते १० तासासाठी हे कोच वापरता येतील. त्यासाठी सुरक्षा ठेव म्हणून २० हजार रुपये भरावे लागतील ते नंतर परत केले जाणार आहेत. मेट्रो कोच जागेवरच उभा असताना आणि प्रवास करत असताना तसेच सजविलेला आणि बिन सजविलेला कोच यासाठी वेगळे भाडे आकारले जाईल. त्यासाठी काही अटी आहेत.

हे कार्यक्रम रोजच्या मेट्रो वेळात होणार असतील तर ते रात्री ११ ते २ या वेळात करण्याचा पर्यायही दिला गेला आहे. अश्या कार्यक्रमांना ५० लोकांना आमंत्रण देता येईल. राउंड ट्रीप आणि बिना सजावट कोच साठी प्रतीतास ८ हजार, एका जागी उभ्या आणि बिना सजावट कोच साठी ५ हजार असे भाडे आकारले जाणार आहे. जयपूर मेट्रो मध्ये ही सुविधा लोकप्रिय ठरली आहे. सजावट केलेल्या कोच साठी राउंड ट्रीप १० हजार तर स्थिर कोच साठी ७ हजार रुपये खर्च करावे लागतील.

Leave a Comment