क्रिकेटपटू मायकेल क्लार्कचा घटस्फोट,पत्नीला मिळणार २८५ कोटी


फोटो सौजन्य नवभारत टाईम्स
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्क व त्याची पत्नी कायली यांनी एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. या दोघांनी संयुक्तपणे द. ऑस्ट्रेलियन या वर्तमानपत्रात एक पत्रक जारी केले असून परस्पर संमतीने विभक्त होत असल्याचे त्यात नमूद केले आहे.

क्लार्क आणि कायली यांचा विवाह मे २०१२ मध्ये झाला होता आणि त्यांना चार वर्षाची एक मुलगी आहे. फॉक्सच्या बातमीनुसार गेले पाच महिने हे दोघे वेगळे राहत आहेत. जारी केलेल्या पत्रकात या दोघांनी एकमेकांबद्दल आदर व्यक्त केला असून मुलीचे संगोपन दोघे मिळून करणार असल्याचे म्हटले आहे. क्लार्क सध्या दुसरीकडे राहत असून कायलीला ४० मिलियन डॉलर्स म्हणजे २८५ कोटी रुपये देणार आहे. त्यात घराचा समावेश आहे. ३८ वर्षीय कायली त्यांच्या पहिल्या घरात मुलीसह राहत आहे.

मायकेल क्लार्कच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने २०१५ मध्ये वर्ल्ड कप जिंकला होता. त्याने ११५ कसोटी खेळल्यावर क्रिकेट संन्यास घेतला असून २४५ वनडे आणि ३४ टी २० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. २०१८ मध्ये त्याच्या क्रिकेट अकादमीतील सहकारी साशा बरोबर त्याचे अफेअर असल्याची चर्चा सुरु झाली होती.

Leave a Comment