व्हायरल: या ट्रिकने दुरूस्त करा चेन

कधी जॅकेट घातल्यानंतर अचानक त्याची चेन बिघडल्याचे तुमचा बरोबर घडले आहे ? अनेकदा असे होते की जिन्स अथवा जॅकेट घातल्यावर त्याची चेन खराब होते. चेन असलेल्या वस्तू यामूळे परत वापरता येत नाहीत. या चेन त्वरित दुरूस्त देखील करता येत नाही.

मात्र सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. यामध्ये चेन खराब झाल्यास अगदी घरच्या घरी ती दुरुस्त करण्याची सोपी पद्धत सांगितली आहे.

https://twitter.com/engineeringvids/status/1226717948959584258

या 14 सेंकदाच्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एका साध्या फोर्कद्वारे (काट्याचा चमचा) सहज बिघडलेली चेन लावता येते.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, आतापर्यंत 16 मिलियन पेक्षा अधिक व्ह्यूज या व्हिडीओला आले आहेत. तर शेकडो युजर्सनी यावर कमेंट्स केल्या आहेत.

हॉलिवूड स्टार रयान रेनॉल्ड्स देखील या व्हिडीओने प्रभावित झाला. रयानने व्हिडीओ शेअर करत लिहिले की, मी आयुष्यभर या गोष्टीची वाट पाहत होतो.

https://twitter.com/MachoRicho/status/1227313304340705280

अनेक युजर्सनी तर चेन दुरूस्त करण्यासाठी ही पद्धत त्वरित वापरून देखील पाहिली. मात्र काही जणांना यश आले नाही. तर काही युजर्सनी आपण हे नक्की ट्राय करणार असे लिहिले.

Leave a Comment