रेहमानच्या मुलीला बुरख्यात पाहून गुदमरल्यासारखे होते – तस्लिमा नसरीन

संगीतकार ए. आर. रेहमानच्या मुलीला बुर्खा परिधान केल्यामुळे अनेकदा ट्रोल करण्यात आलेले आहे. आता लेखिका तस्लिमा नसरीन यांनी देखील यावरून रेहमानवर निशाणा साधला आहे. नसरीन यांनी ए. आर. रेहमानच्या मुलीने बुर्खा घातल्याबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत.

तस्लिमा नसरीन यांनी ट्विट केले की, मला ए. आर. रेहमानचे म्यूझिक आवडते. मात्र जेव्हाही मी त्यांच्या मुलीला पाहतो, तेव्हा मला गुदमरल्या सारखे होते. हे खूप चिंताजनक आहे की सुसंस्कृत घरातल्या शिक्षित महिला देखील सहज ब्रेनवॉश होतात.

तस्लिमा नसरीनने शेअर केलेल्या फोटोवरून ए. आर. रेहमानला याआधी देखील ट्रोल करण्यात आलेले आहे. रेहमानने सोशल मीडियावर आपल्या कुटुंबाचा फोटो शेअर केला होता. यात त्याचे कुटुंब नीता अंबानी यांच्यासोबत दिसत आहे. तस्लिमा नसरीन यांनी हाच फोटो क्रॉप करून शेअर केला आहे.

बुर्खा घालण्यावर रेहमानची मुलगी खातिजा म्हणाली होती की, मला बुर्खा घालण्यासाठी कोणीही जबरदस्ती करत नाही. मी जर बुर्खा घालते, तर ती माझी आवड आहे. मी प्रौढ आहे, मला काय परिधान करायचे आणि काय नाही हे माहिती आहे.

Leave a Comment