मोठ्या खड्ड्यात कार कोसळल्यानंतर आश्चर्यकारकरित्या वाचला चालक

अमेरिकेतील ब्रेंटवूड येथे कार सिंकहोलमध्ये कोसळल्यानंतर चालक आश्चर्यकारकरित्या वाचल्याची घटना समोर आली आहे. अमेरिकेतील काही भागांमध्ये सिआरा वादळामुळे मोठे नुकसान झाले आहे. या वादळामुळे एकारात्रीत रस्त्यावर हा खड्डा निर्माण झाला.

फोटोमध्ये दिसत आहे की टोयोटो प्रिअस ही सिंकहोलमध्ये अडकली आहे. हा खड्डा तब्बल 6.5 फूट खोल होता. अखेर अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी 2 तासांच्या अथक प्रयत्नांनतर कार बाहेर काढली.

कारचे दोन्ही एअरबॅग्स उघडलेले होते. त्यामुळे कार चालक सुरक्षित असल्याचे शक्यता वर्तविण्यात येत आहे.

सिंकहोलच्या जवळच राहणारे गॉर्डन हमफ्रेय यांनी सांगितले की, त्यांनी कार सिंकहोलमध्ये कोसळल्यानंतर एक मोठा आवाज ऐकला. पाण्याचा आवाज, गॅसचा वास येत होता.

Leave a Comment