हे आहेत जगातील सर्वात वयोवृद्ध पुरुष, गिनीज बुकमध्ये नोंद

जापानचे चितेत्सू वतनाबे हे जगातील सर्वात वयोवृद्ध पुरूष ठरले आहेत. 12 फेब्रुवारी 2020 ला त्यांचे वय 112 वर्ष 344 दिवस होते. याबाबतची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये देखील करण्यात आली आहे.

चितेत्सू यांचा जन्म नीगाता येथे 5 मार्च 1907 ला झाला होता. त्यांना 8 मुले आहेत. ते ऊसाच्या शेतात काम करत असे. त्यांच्या कुटुंबातील सदस्य सांगतात की, ते कधीच दुःखी होत नाहीत व ओरडून बोलत नाही. नेहमी आनंदात असतात. कृषिविषयात पदवी घेतल्यानंतर ते ताइवानला गेले व तेथे ऊसाच्या शेतात काम करू लागले. द्वितीय विश्वयुद्धात त्यांनी सैन्यात काम केले. त्यानंतर ते नीगाता येथे परतले व निवृत्तीपर्यंत सरकारी कार्यालयात काम केले. त्यावेळी देखील देखील फॉर्ममध्ये  फळे व भालेभाज्यांची लागवड करत असे.

चितेत्सू यांच्या आधी जापानचेच मासाजो नानाको जगातील सर्वात वृद्ध पुरूष होते. 20 जानेवारी 2019 ला त्यांचे निधन झाले. त्यावेळी त्यांचे वय 113 वर्ष 54 दिवस होते. सध्या जापानच्याच केन तनाका जगातील सर्वात वयोवृद्ध जिवित महिला आहेत. त्यांचे वय 117 वर्ष आहे.

Leave a Comment