व्हायरल: चक्क व्हिडीओ कॉलद्वारे केला ‘रोका’

सोशल मीडियावर सध्या एका गुजराती कुटुंबाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये ते विधी करताना दिसत आहेत. हे कुटुंब कोण आहे, हे अद्याप मात्र समजलेले नाही. हा व्हिडीओ वेब सीरिज ‘मेट्रो पार्क’ची आठवण करून देत आहे.

या व्हिडीओला राहुल निनगोट या युजर्सने ट्विटवर शेअर केले होते. सोबतच त्याने मेट्रो पार्कच्या कलाकारांना देखील टॅग केले. त्यानंतर सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

व्हिडीओमध्ये एक गुजराती कुटुंब पारंपारिक विधी व्हिडीओ कॉलच्या मदतीने पार पाडताना दिसत आहे. हे एखाद्या रोका विधीप्रमाणे वाटत आहे. मुला-मुलीला व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून कनेक्ट करण्यात आले आहे. एक महिला त्यानंतर महिला असलेल्या मोबाईलवर लाल रंगाची चुनरी (कापड) टाकते. तर दुसऱ्या मोबाईलला टिळा लावते. रोका हा कार्यक्रम जोडपे आणि त्यांच्या कुटुंबाकडून लग्नाला दिलेली परवानगी असते.

Leave a Comment