नेहरू-पटेल यांच्यावरून ट्विटरवर भिडले एस जयशंकर आणि रामचंद्र गुहा

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि गृहमंत्री सरदार पटेल यांच्यातील नात्यावरून देशाचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि इतिहासकार रामचंद्र गुहा हे सोशल मीडियावर एकमेंकाशी वाद घालताना दिसले. एका पुस्तकाचा संदर्भ देत जयशंकर यांनी काही दावा केला होता. यानंतर गुहा यांनी त्याला उत्तर दिले.

परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी व्हीपी मेनन यांच्या आयुष्यावरील एका पुस्तकाचे संदर्भ दिला. व्हीपी मेनन हे फाळणीच्या वेळी पटेल आणि नेहरू यांच्यासोबत काम करणारे अधिकारी होते. याच पुस्तकाचा उल्लेख करत ट्विट केले की, पुस्तकावरून समजले की नेहरुंना 1947 च्या कॅबिनेटमध्ये सरदार पटेल नको होते. या गोष्टीवर वादविवाह व्हायला हवा. खास गोष्ट म्हणजे लेखक आपल्या दाव्यावर ठाम आहे.

यावर उत्तर देताना इतिहासकार गुहा यांनी ट्विट केले की, हे एक मिथ आहे, ज्याचा खुलासा आधीच झाला आहे. या प्रकारे आधुनिक भारताच्या निर्मात्यांबाबत फेक न्यूज पसरवणे एका परराष्ट्र मंत्र्याला शोभत नाही. हे काम भाजप आयटी सेलवर सोपवावे.

गुहा यांच्या या ट्विटला उत्तर देताना पुन्हा एकदा जयशंकर यांनी निशाणा साधला. त्यांनी लिहिले की, काही परराष्ट्रमंत्री देखील पुस्तके वाचतात. चांगले होईल की, काही प्राध्यपकांनी देखील असे काम केले तर चांगले होईल. यासाठी काल प्रकाशित झालेले देखील सुचवतो.

दरम्यान, इतिहासात पाहिल्यावर असे दिसते की 1947 मध्ये सरकारच्या निर्मिती वेळी स्वतः जवाहरलाल नेहरू यांनी सरदार पटेल यांना पत्र लिहिले होते व त्यात त्यांच्याशिवाय कॅबिनेट अर्धवट असेल असे म्हटले होते. नेहरू यांनी स्वतः सरदार पटेल यांना कॅबिनेट मंत्री होण्यासाठी विचारले होते.