20 वर्षांपुर्वी गेली होती दृष्टी, अपघातानंतर परतली

20 वर्षांपासून एका डोळ्याने दिसत नसलेल्या पोलंडमधील एका व्यक्तीची दृष्टी अपघातानंतर परत आली आहे. गोरजोव विकोपोलस्की शहरातील जानूस्ज गोराज यांचा हा अपघात 2018 मध्ये झाला होता. मात्र माध्यमांमध्ये याबाबतचा रिपोर्ट आता आला आहे.

वर्ष 2018 मध्ये साइड इफेक्ट्समुळे त्यांना डाव्या डोळ्याने दिसणे बंद झाले होते. त्यांना केवळ उजव्या डोळ्यांनी दिसत असे. मात्र 2018 मध्ये रस्ता पार करताना त्यांना अचानक कारची धडक बसली. यावेळी त्यांच्या डोक्याला धडक बसली. त्यांच्या पृष्ठभागाला देखील दुखापत झाली. त्यांच्यावर शस्त्रक्रिया देखील करण्यात आली. त्यानंतर त्यांनी डोळे उघडल्यावर दोन्ही डोळ्यांनी स्पष्ट दिसत होते.

त्यांनी ही गोष्ट डॉक्टरांना देखील सांगितली. मात्र शस्त्रक्रिया पृष्ठभागाची झाली व डोळ्यांवर त्याचा कसा परिणाम झाला हे डॉक्टरांना देखील सांगता आले नाही. मात्र एका डॉक्टरांचे म्हणणे आहे की, असे वापरण्यात आलेल्या औषधांमुळे झालेले असू शकते.

गोराज यांनी सांगितले की, हॉस्पिटलच्या बेडवर जेव्हा मुला डाव्या डोळ्यांनी देखील पाहता येत होते, तेव्हा मला खूपच आनंद झाला. मला रस्त्यावर लोक स्पष्ट दिसत होते. फोनचे मेसेज वाचता येत होते. माझे आयुष्यच बदलून गेले.

डॉक्टरांनी याचा अभ्यास करण्यासाठी गोराज यांच्याकडे परिक्षणाची देखील मागणी केली. मात्र त्यांनी यासाठी नकार दिला.

Leave a Comment