कोरोना व्हायरसमुळे रद्द झाला सर्वात मोठा मोबाईल टेक इव्हेंट

जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसचा परिणाम टेक्नोलॉजी इंडस्ट्रीवर देखील पाहायला मिळत आहे.  या व्हायरसमुळे बार्सिलोना येथे होणारा जगातील सर्वात मोठा टेक इव्हेंट मोबाईल वर्ल्ड काँग्रेस 2020 (एमडब्ल्यूसी 2020) रद्द करण्यात आला आहे.

हा इव्हेंट 24 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी दरम्यान पार पडणार होता. कोरोना व्हायरसमुळे अनेक दिग्गज टेक कंपन्यांनी या इव्हेंटमध्ये सहभागी होण्यास नकार दिला होता, ज्यानंतर जीएसएम असोसिएशनने या वर्षीचा इव्हेंट रद्द करण्याचा नकार दिला.

काय आहे एमडब्ल्यूसी ?

या इव्हेंटचे आयोजन दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात स्पेनच्या बार्सिलोना येथे करण्यात येते. हा टेलिकॉम सेक्टरमधील सर्वात मोठा इव्हेंट आहे. स्पॉन्सर्ससह अनेक छोट्या-मोठ्या टेक कंपन्यांनी इव्हेंटमध्ये सहभागी होण्यास नकार दिला आहे. नोकिया, सॅमसंग, एचएमडी ग्लोबल, एलजी, व्हिवो, अ‍ॅमेझॉन यासारख्या अनेक मोठ्या कंपन्यांनी माघार घेतली आहे. या टेक इव्हेंटमध्ये 1 लाखांपेक्षा अधिक लोक सहभागी होणार होते. त्यातील 5 ते 6 हजार जण चीनमधील होते.

शाओमी, रिअलमी आणि ह्युवाई सारख्या चीनी कंपन्या देखील या इव्हेंटमध्ये आपले डिव्हाईस लाँच करणार होते.

Leave a Comment