इतक्या कोटींची आहे जेफ बेझॉसची नवीन हवेली

अ‍ॅमेझॉनचे सीईओ आणि जगातील सर्वात श्रींमत व्यक्ती असलेल्या जेफ बेझॉस यांनी मीडिया मुघल म्हणून ओळखले जाणारे डेव्हिड गेफेन यांच्याकडून तब्बल 165 मिलियन डॉलरला (जवळपास 11.79 अब्ज रुपये) अलिशान हवेली खरेदी केली आहे. ही वॉर्नर एस्टेट हवेली बेवर्ली हिल्स येथे आहे.

याआधी विक्रमी किंमतीत हवेली खरेदी करण्याचा विक्रम लचलॅन मुरडॉकच्या नावे होता. त्यांनी ‘द बेवेर्ली हिल्लीबिल्लीस’ या टिव्ही शोसाठी बेल एअर एस्टेट येथे 150 मिलियन डॉलरला जागा खरेदी केली होती.

गेफेन यांनी 1990 मध्ये 47.5 मिलियन डॉलरला 9.4 एअर एस्टेट खरेदी केली होती. ही जागा वॉर्नर ब्रोस. चे प्रमुख जॅक वॉर्नर यांच्या नावे होती. त्यांनी 1937 मध्ये येथे अलिशन हवेली बांधली होती.

बेझॉस आणि त्यांची गर्लफ्रेंड लॉरेन सॅनझेच हे लॉस एंजिलेस भागात मागील एक वर्षापासून घर शोधत होते. बेझॉस हे येथेच स्थायिक होणार की नाही, याबाबत मात्र अद्याप काहीही माहिती देण्यात आलेली नाही.

Leave a Comment