म्हणून महत्वाचा आहे ट्रम्प यांचा भारत दौरा


फोटो सौजन्य याहू न्यूज
येत्या चोवीस तारखेला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, पत्नी मेलेनियासह भारत दौऱ्यावर येत आहेत. भारत भेटीवर येणारे ट्रम्प हे अमेरिकेचे सातवे अध्यक्ष आहेत. हा दौरा ट्रम्प आणि भारत दोन्हीसाठी अनेक कारणांनी महत्वाचा मानला जात आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान मोदी यांनी ट्रम्प याना २०१९ मध्ये प्रजासत्ताक दिनाचे मुख्य पाहुणे म्हणून बोलावणे केले होते पण त्यावेळी त्यांनी व्यग्र असल्याचे कारण देऊन भारत भेटीवर येण्यास नकार दिला होता. आता मात्र ट्रम्प भारत भेटीवर येत आहेत याचे एक महत्वाचे कारण अमेरिकेत या वर्षात होणाऱ्या अध्यक्षीय निवडणुका असल्याचे मानले जात आहे.

साउथ एशियन अॅडव्होकसी ग्रुपच्या अहवालानुसार अमेरिकेत भारतवंशी नागरिकांची संख्या ३८ टक्क्यांनी वाढली असून त्यामुळे अमेरिकेतील स्थायिक भारतीय ट्रम्प यांच्यासाठी आगामी निवडणूक सोपी करू शकतात. वाढलेल्या भारतीय लोकसंख्येत तेलंगण, आंध्र, गुजराथ, केरळ, पंजाब राज्यातील अनेक लोक असून ट्रम्प गुजराथ मध्ये केम छो ट्रम्प या शो मध्ये सहभागी होणार आहेत.

भारतासाठी ही भेट काही मुद्द्यांवर लाभदायक ठरू शकते. काश्मीर मुद्द्यावर मध्यस्ती करण्याच्या ट्रम्प याच्या इच्छेला भारताने नकार दिला असला तरी सौदीकडून भारताला होत असलेला तेल पुरवठा, इराण मिसाईल कार्यक्रमामुळे त्रस्त झालेल्या ट्रम्प यांच्यासाठी भारत, इराण – अमेरिका संबंधात मध्यस्ती करू शकेल असेही सांगितले जात आहे. भारत भेटीवर आल्यानंतर जिमी कार्टर वगळता बाकी अन्य सर्व अमेरिकन अध्यक्षांनी पाकिस्तानला भेट दिली होती. ट्रम्प पाकिस्तान भेटीवर जाणार नसल्याचे समजते.

Leave a Comment