मि. बिन वुहानमध्ये, युकेला इतक्यात परतणार नाही - Majha Paper

मि. बिन वुहानमध्ये, युकेला इतक्यात परतणार नाही


फोटो सौजन्य इंडिया टाईम्स
आपल्या नर्मगरम विनोदाने आणि कॉमिक अदांनी मि. बिनची भूमिका साकारून लोकप्रियतेच्या शिखरावर आरूढ झालेला ब्रिटीश कॉमेडीयन अभिनेता निगेल डिक्सन कोरोनाचा प्रकोप झालेल्या वुहान या चीनी शहरात गेले काही दिवस अडकला असून त्याने तो सुरक्षित आहे आणि आनंदात आहे असा संदेश दिला आहे. विशेष म्हणजे निगेलने त्याच्यामुळे ब्रिटन मध्ये कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी इतक्यात ब्रिटनला परतणार नसल्याचे जाहीर केले आहे.

निगेल सुट्टी साजरी करण्यासाठी २ जानेवारीला चीन मध्ये पोहोचला होता. चीनी नववर्षाचा महोत्सव त्याला पहायचा होता. मात्र वुहान मध्ये असतानाच करोना विषाणूची बाधा लोकांना होऊ लागली आणि निगेल तेथेच अडकला. निगेलने तेथे करोनाच्या साथीनंतरचे त्याचे आयुष्य या विषयावर एक मिनी सिरीज सुरु केली असून मि. पी या नावाने प्रसारित होत असलेल्या या सिरीजला आत्तापर्यंत ५.५ दशलक्ष फॉलोअर मिळाले असल्याचे समजते.

५३ वर्षीय निगेलच्या मते आपण ग्लोबल फॅमिली आहोत आणि त्यामुळे संकटकाळात एकमेकांना साथ देणे आवश्यक आहे. म्हणून त्याने वुहान येथेच थांबण्याचा निर्णय घेतला आहे. एक दिवसापूर्वी वुहानचा रहिवासी भाग सील केला गेला आहे मात्र निगेल सांगतो तो अगदी सुरक्षित आहे.

Leave a Comment