धरमपाजीचे नवे रेस्टॉरंट ‘ही मॅन’ व्हेलेंटाईन डे ला सुरु


फोटो सौजन्य झी न्यूज
बॉलीवूड दुनियेत ही मॅन नावाने प्रसिद्ध असलेल्या धरमपाजी उर्फ धर्मेंद्र यांनी व्हेलेंटाईन डे दिवशी ही मॅन या नावाने दुसरे रेस्टॉरंट सुरु करत असल्याची महिती इन्स्टाग्रामवर दिली असून चाहत्यांना उद्घाटनासाठी येण्याचे आमंत्रण दिले आहे. ८४ वर्षीय धर्मेंद्र यांचे हे दुसरे रेस्टॉरंट असून पहिले गरमधरम ढाबा नावाचे रेस्टॉरंट त्यांनी करनाल हायवेवर सुरु केले होते ते खूप लोकप्रिय झाले आहे. धर्मेंद्र यांच्या पहिल्या रेस्टॉरंटमध्ये त्यांच्या गाजलेल्या चित्रपटातील चित्रे, शोले मधील मोटरसायकल ठेवली गेली आहे.


नव्या रेस्टॉरंटचे नाव फार्म टू फोर्क असे असून येथे थेट शेतातून ताज्या भाज्या, धान्य, फळे खवैयांच्या टेबलवर येणार आहेत. धर्मेंद्र यांनी सोशल मीडियावर उद्घाटनाचे आमंत्रण शेअर करताना चाहत्यांनी त्यांना दिलेले प्रेम आणि सन्मान यांचा आदर केला आहे आणि व्हेलेंटाईन डे ला सकाळी १० वा. उद्घाटनासाठी येण्याचे निमंत्रण दिले आहे.

धर्मेंद्र त्यांच्या मुर्थाल येथील शेतात बराच काळ घालवितात. तेथे काम करत असतानाचे अनेक फोटो यापूर्वी प्रसिद्ध झाले आहेत. त्यांना फिल्मफेअरचा लाईफ टाईम अचिव्हमेंट पुरस्कार मिळाला असून भारत सरकारने पद्मभूषण देऊन त्यांचा गौरव केला आहे.

Leave a Comment