इतर देशांमध्ये अशा वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो व्हॅलेंटाईन

भारतासह जगभरात 14 फेब्रुवारीला व्हेलेंटाइन डे साजरा केला जातो. भारतात या दिवशी जोडपे एकमेंकाच्या प्रती प्रेमाची स्विकृती देतात व एकमेंकाना भेटवस्तू देऊन हा दिवस साजरा करतात.  मात्र इतर देशांमध्ये व्हेलेंटाइन डे वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो.

फ्रान्स –

फ्रान्सला जगातील सर्वात रोमँटिक देश म्हणून ओळखले जाते. येथे परंपरेनुसार, व्हेलेंटाईनच्या दिवशी मुली-मुलींची जोडी बनवली जाते. जर एखाद्याला आपला दुसरा जोडीदार हवा असेल, तर ते त्याची देखील निवड करू शकतात. तसेच ज्या महिलेला जोडीदार मिळत नाही त्या व्यक्तीचा फोटो आगीत जाळतात.

Image Credited – pixabay

इटली –

इटलीत व्हेलेंटाइन डे ‘स्प्रिंग फेस्टिव्हल’ म्हणून साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यासाठी नागरिक एखाद्या गार्डनमध्ये जमा होऊन म्यूझिकचा आनंद घेतात. तसचे असे मानले जाते की मुलगी सकाळी ज्या मुलाचा चेहरा पाहते, तोच तिचा पती होतो.

इंग्लंड –

इंग्लंडमध्ये व्हेलेंटाइन डे खास करून मुली साजरा करतात. या दिवशी त्या उशी खाली 5 पाने ठेऊन झोपतात. असे यासाठी करतात, जेणेकरून त्यांना स्वप्नात आपला जोडीदार दिसेल.

Image Credited – pixabay

दक्षिण कोरिया –

या देशात व्हेलेंटाइन डे फेब्रुवारी ते मार्च दरम्यान साजरा केला जातो. 14 फेब्रुवारीला मुली आपली जोडीदाराला चॉकलेट्स आणि गिफ्ट्स देतात. तर मुले 14 मार्चला आपल्या जोडीदाराला रिटर्न गिफ्ट्स पाठवतात.

ब्राझील –

ब्राझीलमध्ये व्हेलेंटाइन डे 12 जूनला साजरा होतो. या दिवशी पार्टनर एकमेंकाना गिफ्ट्स, चॉकलेट इत्यादी गिफ्ट्स देतात.

Image Credited – publicdomainpictures

दक्षिण आफ्रिका –

येथे महिला आपले प्रेम दर्शवण्यासाठी हातावर जोडीदाराचे नाव गोंदवतात. सोबतच जोडपी आपल्या हातावर दिल देखील काढतात.

फिलिपाईन्स –

येथे व्हेलेंटाइन डेच्या दिवशी लोक सामुहिक विवाह करतात. यामुळे येथे या दिवसाला ‘वेडिंग डे’ देखील म्हणतात.

Image Credited – pickpik

अमेरिका –

अमेरिकेत भारताप्रमाणेच हा दिवस साजरा केला जातो. जोडपे एकमेंकाना चॉकलेट, पुष्पगुच्छ देऊन आपल्या मनातले सांगतात.

डेनमार्क –

डेनमार्कमध्ये व्हेलेंटाइन डे 1990 पासून साजरा केला जात आहे. येथे मुले आपल्या पार्टनरला कार्ड पाठवतात, ज्याला ‘जोकिंग लेटर’ म्हणतात. या कार्डावर पाठवणाऱ्याचे नाव लिहिलेले नसते. मुलींना त्या व्यक्तीचे नाव ओळखायचे असते. जी मुलगी खरे नाव ओळखते तिला ईस्टर एग दिले जाते.

Image Credited – pickpik

वेल्स –

वेल्समध्ये 25 जानेवारीलाच व्हेलेंटाइन डे साजरा केला जातो. या दिवशी मुले-मुली एकमेंकाना लाकडाचे चमचे भेट देतात. या चमच्यांना ‘लव्ह स्पून्स’ म्हटले जाते. या चमच्यांवरच लोक आपल्या प्रेमाचा संदेश लिहितात.

जापान –

जापानमध्ये व्हेलेंटाइन डे केवळ मुलेच साजरी करतात. तर मुली वडील, भाऊ, पती, मित्र आणि प्रियकराचे आभार प्रकट करण्यासाठी चॉकलेट्स अथवा भेटवस्तू देतात.

Leave a Comment