सॅमसंगने सादर केले ‘गॅलेक्सी एस20’ सीरिजमधील धमाकेदार स्मार्टफोन

सॅमसंगने आपली बहुप्रतिक्षित एस सीरिजमधील स्मार्टफोन गॅलेक्सी एस20, गॅलेक्स एस20+ आणि गॅलेक्सी एस20 अल्ट्रा लाँच केले आहेत. सॅमसंगच्या या तिन्ही स्मार्टफोनमध्ये 120 हर्ट्ज रिफ्रेश रेट डिस्प्ले, 5जी, शानदार कॅमेरा आणि 8के व्हिडीओ रेकॉर्डिंग सपोर्ट, पॉवरफूल बॅटरी मिळेल. गॅलेक्सी 20 आणि गॅलेक्सी एस20+ या स्मार्टफोनला गॅलेक्सी एस10 आणि आणि गॅलेक्सी एस10+ पासून अपग्रेड करण्यात आले आहे. तर गॅलेक्सी एस20 अल्ट्रा एकदम नवीन आहे.

Image Credited – engadget

किंमत –

सॅमसंग गॅलेक्सी एस20 सीरिजमधील हे स्मार्टफोन 6 मार्चपासून वेगवेगळ्या रंगात उपलब्ध असतील. या स्मार्टफोनची किंमत 999.99 डॉलर (जवळपास 71,300 रुपये) ते 1,599.99 डॉलर (जवळपास 1,14,100 रुपये) आहे. सॅमसंग गॅलेक्सी एस205G ची किंमत 999 डॉलर पासून सुरू आहे. तर सॅमसंग गॅलेक्सी एस20+ 5G ची किंमत 1,199 डॉलर (जवळपास 85,500 रुपये) आणि सॅमसंग गॅलेक्सी एस20 अल्ट्रा 5Gची सुरुवाती किंमत 1,399 डॉलर (जवळपास 99,800 रुपये) असेल. हा फोन भारतात कधी उपलब्ध होईल याची माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.

Image Credited – engadget

सॅमसंग गॅलेक्सी एस20 स्पेसिफिकेशन्स –

सॅमसंग गॅलेक्सी एस20 मध्ये 6.2 इंचाची इनफिनिटी ओ डायनमिक एमोलेड 2X डिस्प्ले असेल. स्क्रीन क्वाडएचडी (1,440×3,200 पिक्सल) रिझॉल्यूशन आणि 563 पीपीआई पिक्सल डेनसिटीसोबत येते. स्क्रीन HDR10 सर्टिफाइड आहे आणि यात 120 हर्ट्ज़ रिफ्रेश रेट आहे. फोनमध्ये 7nm ऑक्टा-कोर प्रोसेसर आहे. काही भागात या फोनमध्ये सॅमसंग एक्सीनॉस 990 प्रोसेसर तर काही ठिकाणी क्वालकॉम स्नैपड्रैगन 865 प्रोसेसर देण्यात येईल.

Image Credited – engadget

सॅमसंग गॅलेक्सी एस20 मध्ये 8 जीबी आणि 12 जीबी रॅमचा पर्याय मिळे. स्टोरेज 128 जीबी आहे. यात बायोमॅट्रिक ऑथेंटिकेशनसाठी अल्ट्रासोनिक इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर आणि फेस रिकॉग्निशन मिळेल. गॅलेक्सी एस20 ला IP68 सर्टिफिकेशन मिळेल. या स्मार्टफोनमध्ये 25 वॉट फास्ट चार्जिंग, फास्ट वायरलेस चार्जिंग 2.0 आणि रिव्हर्स वायरलेस चार्जिंग सपोर्ट मिळेल.

कॅमेऱ्याबद्दल सांगायचे तर यात तीन रिअर कॅमेरे मिळतील. 12 मेगापिक्सलचा वाइड-अँगल सेंसर, ज्यात एफ/1.8 अपर्चर आहे. दुसरा कॅमेरा देखील 12 मेगापिक्सल तर तिसरा कॅमेरा 64 मेगापिक्सल आहे. सेल्फीसाठी 10 मेगापिक्सल कॅमेरा मिळेल.
फोनमध्ये अँड्राईड 10वर आधारित One UI 2.1, ड्युअल-बँड वाय-फाय 6, ब्लूटूथ 5, एनएफसी, स्टीरिओ स्पिकर्स आणि डॉल्बी एटमस साउंड सारखे फीचर्स मिळतील.

Image Credited – engadget

सॅमसंग गॅलेक्सी एस20+ स्पेसिफिकेशन –

गॅलेक्सी एस20+ हा गॅलेक्सी एस20 सारखाच आहे. यात केवळ साइज, बॅटरी क्षमता आणि एक अतिरिक्त कॅमेरा देण्यात आलेला आहे. सॅमसंग गॅलेक्सी एस20+ चे डायमेंशन 161.9×73.7×7.8 मिलीमीटर आणि वजन 186 ग्रॅम आहे. याच्या 5जी व्हेरिएंटचे वजन 188 ग्रॅम आहे. फोन मध्ये 4,500 एमएएचची बॅटरी मिळेल. एलटीई व्हर्जनमध्ये 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज आहे, तर 5जी व्हेरिएंटमध्ये 12 जीबी रॅम + 128 जीबी, 256 जीबी आणि 512 जीबी स्टोरेज पर्याय आहेत. फ्रंट आणि रिअर कॅमऱ्याच्या सेंसर्समध्ये कोणतेही बदल नसून, केवळ मागील बाजूला एक डेप्था कॅमेरा अधिक देण्यात आलेला आहे.

Image Credited – engadget

गॅलेक्सी एस20+ 6.7 इंच क्वाड-एचडी (1,440×3,200 पिक्सल) डायनमिक एमोलेड 2X डिस्प्ले मिळेल. यात इनफिनिटी ओ होल-पंच आहे.

Image Credited – engadget

सॅमसंग गॅलेक्सी एस20 अल्ट्रा स्पेसिफिकेशन –

गॅलेक्सी एस20 अल्ट्रामध्ये 6.9 इंच क्वाड-एचडी डायनमिक एमोलेड 2X डिस्प्ले आहेत. यात 12 जीबी आणि 16 जीबी असे रॅमचे दोन पर्याय मिळतील. एलटीई आणि 5जी व्हेरिएंटमध्ये इनबिल्ट स्टोरेजसाठी 128 जीबी, 256 जीबी आणि 512 जीबी असे तीन पर्याय. बॅटरी क्षमता 5,000 एमएएच असून, यात 45 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळेल.

Image Credited – engadget

या फोनमध्ये वाइड अँगल आणि डेप्थ कॅमऱ्याशिवाय 108 मेगापिक्सलचा प्राइमरी कैमरा आणि 48 मेगापिक्सलचा टेलीफोटो कॅमेरा मिळेल. गॅलेक्सी एस20 अल्ट्रामध्ये नवीन पेरीस्कोप सारखा टेलीफोटो लेंस देण्यात आली आहे. सेल्फीसाठी यात 40 मेगापिक्सल कॅमेरा मिळेल.

Leave a Comment