चक्क पेपरपासून साकारली रोनाल्डोची भलीमोठी प्रतिमा

इटलीच्या व्हियारिजियो येथे कॉर्निव्हल दरम्यान पोर्तुगीजचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोची पेपरपासून प्रतिमा बनविण्यात आली आहे. या प्रतिमेची परेड देखील काढण्यात आली. यावेळी हजारो लोक उपस्थित होते. या प्रतिमेची उंची 4 मजली इमारती एवढी आहे.

हे कार्निव्हल जगभरातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय व्यक्तींना सन्मान देण्यासाठी ओळखले जाते. रोनाल्डोच्या प्रतिमेला सिल्वर रंगात एखाद्या रोबॉट सारखा लूक देण्यात आला होता.

Image Credited – 9sportpro

मागील महिन्यात पोर्तुगलचे चॉकलेट निर्माता जॉर्ज कारडोसो यांनी रोनाल्डोची चॉकलेट प्रतिमा तयार केली होती. या प्रतिमेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. स्विर्झलँडच्या गिविसेज येथील एका चॉकलेट फॅक्ट्रीमध्ये बनलेल्या 1.87 मीटर उंच प्रतिमेला बनविण्यासाठी 120 किलो चॉकलेटचा वापर करण्यात आला होता.

Leave a Comment