आता या अ‍ॅपद्वारे करा रेल्वे संबंधित तक्रार

भारतीय रेल्वे आपल्या प्रवाशांना आरामदायी व सुरक्षित प्रवासाचा आनंद घेता यावा यासाठी अनेक सुविधा देत आहे. आता प्रवाशांना रेल्वेत प्रवास करत असताना एखाद्या समस्येची तक्रार करायची असल्यास ते थेट अ‍ॅपच्या मदतीने तक्रार नोंदवू शकता. यासाठी रेल्वेने खास ‘रेल मदद’ (Rail Madad)  नावाचे अ‍ॅप आणले आहे.

या अ‍ॅपच्या द्वारे प्रवासी आपली तक्रार नोंदवू शकतात आणि रेल्वेकडून काय कारवाई करण्यात येत आहे, याचा रिअल टाइम फिडबॅक देखील पाहू शकतात. रेल्वेचे हे अ‍ॅप 12 भाषांमध्ये उपलब्ध आहे.

रेल्वे मंत्रालयाने ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. ट्विटनुसार ग्राहक या अ‍ॅपद्वारे तक्रार, चौकशी आणि मदत मागू शकतात. या अ‍ॅपद्वारे ग्राहक फ्रेट आणि पार्सलची देखील तक्रार करू शकतात.

रेल्वेचे हे मदद अ‍ॅप एनटीईएस (NTES), पीआरएस (PRS), यूटीएस (UTS) आणि आयसीएमएसशी (ICMS) जोडलेले आहे.
प्रवाशांना तक्रार करण्यासाठी अ‍ॅपवर नाव आणि मोबाईल नंबर रजिस्टर्ड करावा लागेल. त्यानंतर ओटीपीच्या मदतीने लॉग इन करता येईल.

तक्रारीसाठी ग्राहकांना आपली पीएनआर नंबर द्यावा लागेल. यानंतर तक्रारींची यादी स्क्रीनवर दिसेल, ज्यावर तक्रार करता येईल. तक्रार करताना फोटो अपलोड करण्याची देखील सुविधा आहे.

यामुळे रेल्वेला रिअल लाइम तक्रार मिळेल व तुम्ही तुमच्या तक्रारीचा फिडबॅक देखील घेऊ शकता. या अ‍ॅपद्वारे जनरल डब्ब्यात प्रवास करणारे प्रवासी देखील तक्रार करू शकतात.

Leave a Comment