एका लॉटरीमुळे रातोरात कोट्याधीश झाला हा मजूर

कधी कोणाचे नशीब बदलेल हे सांगता येत नाही. केरळच्या कन्नूर येथे राहणाऱ्या पेरुन्नम राजन मजूर आहेत. 10 फेब्रुवारीला त्यांच्यासोबत असे काही घडले की, त्यांचे अचानक नशीबच पालटून गेले. रोजंदारीवर काम करणाऱ्या राजन यांना तब्बल 12 कोटींची लॉटरी लागल्याने एका रात्रीत त्यांचे नशीब बदलले.

कराची रक्कम कपात होऊन त्यांना 7 कोटी रुपये मिळणार आहेत.  58 वर्षीय राजन मजूरी करून आपल्या कुटुंबाचे पोट भरतात. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नसली तरी ते आठवणीने लॉटरीचे तिकीट विकत घेत असे. त्यांना विश्वास होता की, एकेदिवशी त्यांचे नशीब नक्की बदलेल.

लॉटरी लागल्यावर राजन म्हणाले की, असे काही होईल याबद्दल कधीच विचार केला नव्हता. आपल्या कुटुंबासोबत लॉटरीचा निकाल बघित्यावर त्यांना खूप आनंद झाला. एवढेच नाही तर विश्वास बसत नव्हता म्हणून त्यांनी अनेकदा लॉटरीचे तिकीट तपासले.

त्यांनी सांगितले की, सुरुवातीला थोलांबरा येथील को-ऑपरेटिव्ह बँकेशी संपर्क साधला. तेथील अधिकाऱ्यांनी कन्नूरच्या जिल्हा बँकेत जाण्यास सांगितले. त्यानंतर त्यांनी आपल्या कुटुंबासोबत जाऊन बँकेत तिकीट जमा केले.

या पैशांचे काय करणार असे विचाऱ्यालावर त्यांनी सांगितले की, आधी काही कर्ज आहे ते फेडणार. त्यानंतर आजुबाजूच्या गरजू लोकांची मदत करेल.

ते म्हणाले की, मला मेहनतीच्या पैशांची किंमत माहिती आहे व पैसे कमवणे सोपे नाही हे देखील माहिती आहे. त्यामुळे हे पैसे वाया जाऊ देणार नाही.

Leave a Comment