काश्मीरचा प्रश्न सुटल्यास बंद होईल पाकिस्तान लष्कराला मिळणारी रसद


एकेकाळी पाकिस्तानचा आणि आता भारतीय नागरिकत्व मिळवणाऱ्या अदनान सामीच्या मते, काश्मीरचा प्रश्न जर या दोन देशांमध्ये सुटला तर पाकिस्तान लष्कराला मिळणारी रसद बंद होईल. अदनान सामी मंगळवारी प्रदर्शित झालेल्या ‘तू याद आया’च्या प्रमोशनमध्ये बोलत होता.

यासंदर्भातील वृत्त दैनिक भास्करने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार नेहमीच काश्मीरसारख्या मुद्द्यांवरून भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव असतो. शांतता दोन्ही देशांमध्ये का स्थापित होत नाही? याचे उत्तर 60-70 वर्षांपासून शोधले जात आहे, जे राजकारणापेक्षा सैन्यात दडलेले आहे. विशेषत: पाकिस्तानी सैन्यात. कारण पाकिस्तानी लष्कराला काश्मीरचा मुद्दा उपस्थित करण्यासाठी निधी मिळतो.

काश्मीरचा प्रश्न ज्या दिवशी सुटेल, त्या दिवशी त्यांची रसद थांबेल. जर त्या घडामोडी समजून घेण्याचा आपण प्रयत्न केला तर आपणास आढळेल की, दोन्ही देशांच्या नेत्यांनी जेव्हा शांतता प्रस्थापित करण्यासाठी अनेक प्रयत्न केले, तेव्हा कुठेतरी हल्ला झाला. कधी ते कारगिल होते. कधी ते पुलवामा होते. असे का होते? ही एक साधी बाब आहे की, काश्मीरचा मुद्दा संपू नये अशी पाकिस्तानी लष्कराची इच्छा आहे.

यावेळी बोलताना अदनानने नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) विषयावर देखील भाष्य केले. भारतीय नागरिकांशी सीएएचा कोणताही संबंध नाही. अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेशातील अल्पसंख्यांकांसोबत याचा संबंध आहे, जे येथे येऊन शरणार्थी म्हणून जगतात. ज्यांचा धार्मिक छळ झाला आहे. त्यांना नागरिकत्व मिळवण्याचा एक मार्ग तयार केला गेला आहे जेणेकरुन त्यांना 11 वर्षे प्रतीक्षा करावी लागणार नाही. त्यांच्या देशात ते परत जाऊ शकत नाहीत, कारण तेथे त्यांचा छळ होतो. मग ते कुठे जातील? त्या लोकांसाठी सीएए ही एक प्रकारची सुविधा आहे.

मुस्लिम अल्पसंख्याक या तीन देशांमध्ये नाहीत हे खरे आहे. ते तेथील बहुसंख्य आहेत. त्यांचा धर्माच्या नावाखाली छळ केला जात नाही. तथापि, एखादा मुस्लिम जर त्या देशांमधून आला आणि ज्याने नागरिकत्व मिळण्याची सामान्य प्रक्रिया पूर्ण केली तर भारत सरकार त्याला नागरिकत्व देईल. नागरिकत्व अजिबात देणारच नाही असे सरकार म्हणत नाही.

1952 च्या नागरिकत्व दुरुस्ती अधिनियमान्वये असे लिहिले आहे की, इतर कोणत्याही देशातील कोणतीही व्यक्ती, धर्म काहीही असो, कार्यपद्धती लागू करून अर्ज करू शकते. नागरिकत्व 11 वर्षे मुदतीनंतर मिळू शकते. नागरिकत्व घेण्याची ही प्रक्रिया खूप जुनी आहे. तीच सुरु आहे. हे सर्व निकष मीसुद्धा पूर्ण केले आणि मलाही भारताचे नागरिकत्व मिळाले. पुढे, या प्रक्रियेद्वारे जो कोणी नागरिकत्व घेऊ शकतो. यावर काही बदल झाले आहेत असे नाही.

Leave a Comment