पाक न्यायालयाने हाफिज सईदला सुनावली पाच वर्षांची शिक्षा


लाहोर – पाकिस्तानच्या लाहोरमधील एका न्यायालयाने २००८ मधील मुंबई हल्ल्यातील प्रमुख आरोपी आणि लष्करे तैय्यबा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हाफिज सईदला शिक्षा सुनावली असून हाफिज सईदला दहशतवाद्यांना अर्थपुरवठा केल्याच्या आरोपात दोषी ठरवण्यात आले असून त्याला पाकिस्तानी न्यायालयाने 11 वर्षांच्या तुरुंगवासाची आणि 15 रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे.

पाकिस्तानमध्ये हाफिज सईद याच्यावर २३ दहशतवादी गुन्हे दाखल आहेत. दहशदवाद्याचा गुन्हा भारताने त्याच्याविरोधात दाखल केला असताना त्याला पाकिस्तानने मोकळे सोडले होते. त्याचबरोबर भारतविरोधी रॅलीमध्येही त्याला भाषणाला परवानगी देण्यात आली होती.

पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय दबवानंतर हाफिज सईदच्या विरोधात दहशतवादाचे गुन्हे दाखल केले होते. दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याचा गुन्हा त्याच्याविरोधात दाखल करण्यात आला होता. २०१७ मध्ये हाफिज सईदसह त्याच्या चार सहकाऱ्यांना पाकिस्तान सरकारने दहशतवादाच्या गुन्ह्यात ताब्यात घेतले होते. त्यानंतर ११ महिन्यानंतर त्याची सुटका करण्यात आली होती.

Leave a Comment