या टीममुळे ‘आप’ला दिल्लीत मिळाले घवघवीत यश

दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत आप आदमी पक्षाने 70 जागांपैकी 62 जागांवर दणदणीत विजय मिळवत पुन्हा एकदा दिल्लीची सत्ता आपल्या हातात ठेवली आहे. या निवडणुकीत भाजपने 8 जागा जिंकल्या तर काँग्रेसला एकही जागा जिंकता आली नाही. या विजयासोबतच अरविंद केजरीवाल हे दिल्लीचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत.

आम आदमी पक्षाच्या या विजयामागे अरविंद केजरीवाल यांच्यासह अनेक नेत्यांची महत्वाची भूमिका आहे. डिजिटल आणि सोशल मीडियापासून ते पक्षाच्या कार्यकर्त्यांना सांभाळण्याचे काम एक टीम करते, या टीममुळेच आपला घवघवीत यश मिळाले. या टीमविषयी जाणून घेऊया.

Image Credited – Navbharattimes

पृथ्वी रेड्डी –

बंगळुरूचे उद्योगपती पृथ्वी रेड्डी इंडिया अगेंस्ट करप्शन आंदोलनावेळी कोर कमेटीचे सदस्य होते. पक्षाच संस्थापक सदस्य असलेले पृथ्वी पक्षाच्या क्राउंड फंडिंगकडे लक्ष देतात. कार्यकर्त्यांच्या टीमचे देखील ते नेतृत्व करतात. निवडणुकीदरम्यान त्यांना आपल्या कॅम्पेनमध्ये नुक्कड नाटक, फ्लॅश मॉब, म्यूझिकल वॉकसह जनतेला पक्षाशी जोडले.

Image Credited – Navbharattimes

प्रीति शर्मा मेनन –

प्रीति या आम आदमी पक्षाच्या राष्ट्रीय एग्जेक्टिव्ह सदस्य आणि राष्ट्रीय प्रवक्ता आहेत. मुबंईच्या असलेल्या प्रीति यांनी पक्षासाठी अनेक जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. देशाचे बाहेर विंग बनविणे तसेच फंड आणि सोशल मीडिया यासारखी अनेक कामे त्यांनी केली आहेत.

Image Credited – Navbharattimes

कपिल भारद्वाज –

आम आदमी पक्षासाठी कंपिल भारद्वाज गेली अनेक वर्षांपासून पार्टी ऑपरेशन, मीडिया, पीआर, पब्लिसिटीसाठी काम करत आहेत. निवडणुकीत व्यवस्थापनासोबतच दिल्ली ते राष्ट्रीय स्तरावार पक्षाला मजबूत करण्यासाठी त्यांनी काम केले आहे. अमेरिकेतून पदवीधर असलेले कपिल यांनी निवडणुकीत बूथ मॅनेजमेंट, स्टार कँपेनर्सचे शेड्यूल यासारखी कामे केली.

Image Credited – Navbharattimes

जासमीन शाह –

निवडणुकी दरम्यान मीडियासंबंधीत प्रकरणासोबतच जासमीन मॅनिफेस्टो कमिटीचे देखील सदस्य आहेत. ते आप सरकारच्या डायलॉग अँड डेव्हलपमेंट कमिशनचे देखील वाइस चेअरपर्सन आहेत. त्यांनी सरकारच्या अनेक पॉलिसी तयार केल्या आहेत. आयआयटी मद्रासमधून बीटेक-एमटेक केल्यानंतर त्यांनी कोलंबिया यूनिवर्सिटीमधून देखील पदवी घेतली. 2016 मध्ये ते आपशी जोडले गेले.

Image Credited – Navbharattimes

हितेश परदेशी –

डिजिटल इंडस्ट्रीशी संबंधित असलेले हितेश आपसाठी डिजिटल कॅम्पेन करतात. हितेशच्या मजेदार कंटेटने पक्षाचे कॅम्पेन मजेशीर बनवले. निवडणुकीच्या वेळी त्यांचे कॅम्पेन सर्वांना आवडले. निवडणुकीत आयडिया देण्याबरोबरच कंटेंट रायटिंग ते एडिंटिंगवर देखील त्यांनी काम केले. हितेश आधी एआयबी आणि फिल्टर कॉपीमध्ये देखील काम करत होते.

Image Credited – Navbharattimes

आश्वती मुरलीधरन –

2009 पासून अरविंद केजरीवाल यांच्या आरटी आंदोलनाच्या सदस्या असलेल्या आश्वती इंडिया अगेंस्ट करप्शन आंदोलनाच्या देखील संस्थापक सदस्य होत्या. निवडणुकी दरम्यान त्यांनी केजरीवाल यांच्या टाउनहॉल कार्यक्रमांचे व्यवस्थापन केले. मास कम्यूनिकेशनच्या विद्यार्थी असलेल्या आश्वती यांनी मागील 2 निवडणुकींसोबतच यावेळी देखील वॉलंटिअर मॅनेजमेंटसह जनसभेचे देखील व्यवस्थापन केले.

Leave a Comment