महासागरात हरवलेल्या 4 जणांनी तब्बल 32 दिवस असे वाचवले स्वतःचे प्राण

प्रशांत महासागरात नाव पलटल्याने हरवलेल्या 4 जणांनी तब्बल 32 दिवस नारळ खाऊन आणि पावसाचे पाणी पिऊन स्वतःचे प्राण वाचवल्याची घटना समोर आली आहे. मात्र या घटनेमध्ये एका बाळासह 8 जणांचा मृत्यू झाला आहे.

पापुआ न्यू गिनीच्या बोगेव्हिले प्रांतातून एक समूह 22 डिसेंबरला ख्रिसमस साजरा करण्यासाठी कार्ट्रेट आयलँडच्या दिशेने निघाला होता. हे ठिकाण बोगेनव्हिलेपासून 100 किमी अंतरावर आहे.

या घटनेत जिंवत वाचलेल्या डोमिनिक स्टॅलीने सांगितले की, या दरम्यान आमची बोट उलटली व ग्रुपमधील अनेकजण बुडाले. वाचलेल्या काही जणांनी बोट सरळ करण्यात यश मिळवले. मात्र पाण्याच्या प्रवाहात ते खूप लांब निघून आले होते.

त्याने सांगितले की, मृत पावलेल्या व्यक्तींच्या शवासोबत आम्ही काहीही करू शकत नव्हतो. आम्हाला त्यांना समुद्रात तसेच सोडून द्यावे लागले. एक जोडपे देखील मरण पावले. मात्र त्यांनी आपले बाळ मागे सोडले होते. मात्र नंतर ते बाळ देखील वाचू शकले नाही.

स्टॅलीने सांगितले की, आमच्या जवळून अनेक मासेमारी करणाऱ्या बोटी गेल्या, मात्र कोणीही लक्ष दिले नाही. अखेर 23 जानेवारीला एका फिशिंग शिपने न्यू कॅलेडोनियापासून 2000 किमीवरून त्यांना रेसक्यू केले.

या घटनेमध्ये 2 पुरुष, एक महिला आणि एका 12 वर्षीय मुलीचेच प्राण वाचले. शनिवारी त्यांना सोलोमान आयलँडच्या राजधानी होनीयारा येथे सोडण्यात आले. त्यांच्यावर उपचार केल्यानंतर अखेर त्यांना पापुआ न्यू गिनीच्या उच्चायुक्तांकडे सोपविण्यात आले.

Leave a Comment