सायंकाळी 6 नंतर करु नका जेवण, नाहीतर होऊ शकतो हा आजार

वर्षांनू वर्ष भारतात सुर्यास्तापुर्वी जेवण करावी या मान्यतेला आता अमेरिकेच्या संशोधकांनी देखील मोहर लावली आहे. जर सायंकाळी 6 नंतर जेवण केल्यास लठ्ठपणा आणि टाइप 2 चा मधुमेहाचा धोका वाढतो असा दावा करण्यात आलेला आहे.

संशोधकांनुसार, शरीर आपल्या अंतरिक वेळेनुसार कार्य करत असते. रात्रीच्या वेळी पाचन प्रणाली कमी लाळ बनवते, पोट पाचन रसांचे उत्पादन कमी करते. जेवणाला पुढे सारणाऱ्या आतडी गोठल्या जातात व हॉर्मोन इंसुलिनप्रती कमी संवेदनशीलता येते. यावर संशोधन करणारे कॅलिफोर्नियाच्या साक इंस्टिट्युटचे प्रोफेसर सॅचिन पांडा यांच्यानुसार, शरीर आंतरिक वेळेचे पालन करते.

याबाबतची पुष्टी करण्यासाठी उंदराच्या दोन गटांना समान कॅलेरीचे जेवण देण्यात आले. एक गटाचा जेवणाचा कालावधी 24 तास तर दुसऱ्या गटाचा कालावधी 8 तास होता. ज्या गटाला पहिल्या गटाचे वजन वाढले आहे. या गटात उच्च कोलोस्टेरॉल आणि टाइप 2 मधुमेह सारखे लक्षण दिसून आले. तर दुसरा गट अगदी स्वस्थ होता. त्यांच्यामध्ये टाइप 2 मधुमेहाशी लढण्याची क्षमता विकसित झाली होती.

अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या संशोधनानुसार, जे लोक झोपण्याच्या एक तास आधी जेवण करतात, त्यांच्या शरीरातील साखरेच्या मात्रेवर नियंत्रण राहत नाही. प्राध्यापक पांडा यांच्यानुसार, योग्य वेळी जेवण केल्याने आरोग्य व्यवस्थित राहते. कारण यामुळे आतड्यांना स्वतःची काळजी घेण्यासाठी वेळ मिळतो.

रात्री उशिरा जेवण आणि सकाळी लवकर नाश्ता केल्याने आतड्यांना आराम मिळत नाही व त्यामुळे नुकसान होते. त्यामुळे जेवणासाठी निश्चित वेळ ठरवावी व त्यात वारंवार बदल करू नये. यामुळे पाचनतंत्रावर परिणाम होतो.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment