कोण आहे चर्चेचा विषय ठरलेला हा ‘क्यूट केजरीवाल’

दिल्ली विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवत तिसऱ्यांदा सलग सत्तेत येण्याची कामगिरी केली. मात्र या सर्व विजयांमध्ये एक फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला, तो म्हणजे छोट्या केजरीवालचा. गळ्यात मफलर, डोक्यावर टोपी, चष्मा आणि मिशी आणि लाल स्वेटर घातलेल्या या क्यूट केजरीवालचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले.

Image Credited – Amarujala

आम आदमी पक्षाने अधिकृत ट्विट हँडलवरून या चिमुकल्याचा फोटो शेअर केला. मतमोजणीच्या दिवशी सकाळी सकाळी आप कार्यालयाच्या बाहेर पोहचल्यावर या चिमुकल्याने सर्वांचे लक्ष आपल्याकडे खेचले.

Image Credited – Amarujala

या छोट्या मुलाचे खरे नाव आव्यान आहे. आव्यानचे आई-वडिल त्याला केजरीवाल बनवून कार्यालयात घेऊन आले होते.

Image Credited – Amarujala

आव्यानच्या आईने सांगितले की ते केजरीवाल यांचे समर्थक आहेत. आव्यान मोठा होऊन केजरीवाल यांच्या सारखाच व्हावा अशी त्यांची इच्छा आहे. आव्यानसोबत सेल्फी काढण्यासाठी देखील लोकांनी गर्दी केली होती.

Leave a Comment