रिलीज आधीच राजमौलींच्या आरआरआरने कमावले ४०० कोटी!


दिग्दर्शक एस. एस. राजमौली यांच्या आगामी ‘आरआरआर’ या चित्रपटाने रिलीज होण्याआधी नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. अद्याप या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झालेले नसताना, या चित्रपटाने ४०० कोटी रुपयांचा व्यवसाय झाला आहे. हा भारतीय सिने डिस्ट्रिब्युशनच्या क्षेत्रातील अनोखा विक्रम आहे.


‘आरआरआर’ या चित्रपटाची निर्मिती करायचे ‘बाहुबली’ चित्रपटामुळे सर्व परिचित झालेल्या दिग्दर्शक एस. एस. राजमौली यांनी ठरवले आहे. रामचरण, ‘ज्युनियर एनटीआर’ आणि अजय देवगणाला यासाठी साईन केले आहे. सध्या या चित्रपटाची भरपूर हवा आहे. अशातच एक ट्विट करुन ट्रेड विशेषज्ञ कोमल नहाटा यांनी सर्वांनाच चकित केले आहे. त्यांच्या मते राजमौलींचा हा आगामी चित्रपट रिलीज पूर्वीच तब्बल ४०० कोटींचा व्यवसाय करेल.

आपल्या ट्विटमध्ये कोमल नहाटा यांनी एस एस राजमौली यांच्या ‘आरआरआर’ या चित्रपटाने प्रिरिलीज बिझनेसच्याबाबतीत ‘बाहुबली’चा विक्रम मोडला आहे. आंध्र प्रदेश आणि तेलंगणात २५० कोटी, कर्नाटकात ५० कोटी रुपयामध्ये याचे अधिकार विकण्यात आले आहेत. तर ओव्हरसिज हक्क ७० कोटींना विकण्यात आले आहेत. अशा प्रकारे दक्षिण भारत आणि ओव्हरसिज यातून तब्बल ४०० कोटींचा व्यवसाय ‘आरआरआर’ रिलीज पूर्वीच करेल.

यातून असे स्पष्ट होते की पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर राजमौली आपला जलवा दाखवण्यासाठी सज्ज झाले आहेत. काही दिवसापूर्वीच बातमी आली होती की या चित्रपटासाठी अजय देवगण कोणतेही मानधन राजमौलींकडून स्वीकारणार नाही. अजयचा हा पहिलाच दाक्षिणात्य चित्रपट आहे. पुढील वर्षी ८ फेब्रुवारीला ‘आरआरआर’ हा चित्रपट रिलीज होणार आहे. या चित्रटाचा बहुतांश भाग शूट झाला आहे. चाहते आता या चित्रपटाची प्रतीक्षा करीत असले, तरी त्यांना वर्षभर थांबावे लागणार आहे.

Leave a Comment