महिंद्रांनी शेअर केली ‘आयुष्य जगण्याची आवश्यक नियमावली’

उद्योगपती आनंद महिंद्रा हे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असतात. आपल्या फॉलोअर्ससाठी आनंद महिंद्रा नेहमी प्रेरणादायी विचार शेअर करत असतात. आता महिंद्रा यांनी खास आयुष्यासाठी काही नियमावली अर्थात ‘प्रिस्क्रिप्शन फॉर लाइफ’ शेअर केली आहे.

आनंद महिंद्रा यांनी ikigai ही जापानी संकल्पना 10 मुद्यात सांगितली आहे. Ikigai ही एक जापानी संकल्पना आहे. याचा शाब्दिक अर्थ रोज सकाळी उठण्यासाठी आवश्यक असलेले कारण अथवा स्वतःचे अस्तित्व असण्याचे कारण असा होतो.

आनंद महिंद्रांनी Ikigai या संकल्पनेचा सार असलेले 10 मुद्यांचा एक चार्ट शेअर केला आहे. त्यांनी लिहिले की, मी या तत्वज्ञानाशी फारसा परिचित नाही. मात्र आयुष्य जगण्यासाठी आवश्यक असलेले सामान्य ज्ञान समजून घेण्यासाठी तुम्हाला कोणत्याही पीएचडीची गरज नाही. रोज सकाळी दिवसाची सुरूवात करण्याआधी हा चार्ट नक्कीच बघावा.

महिंद्रांनी शेअर केलेला हा चार्ट लेखक हेक्टर ग्रॅसिआ आणि फ्रॅन्सेस्क मिराल्ले यांनी लिहिलेले लोकप्रिय पुस्तक ‘Ikigai: The Japanese Secret To A Long And Happy Life’ वर आधारित आहे.

आनंद महिंद्रा यांच्या या ट्विटला आतापर्यंत 4 हजारांपेक्षा अधिक लाईक्स आले असून, तर शेकडो युजर्सनी यावर कमेंट्स केल्या आहेत.