नॉरफॉक प्राणी संग्रहालयातील वाघसिंहाना लागली परफ्युमची चटक


जगात ऐकावे ते नवल या कॅटेगरीत मोडणाऱ्या अनेक घटना घडत असतात. अशीच एका घटना ब्रिटनच्या नॉरफॉक प्राणी संग्रहालयात घडली असून येथील मार्जार कुळातील जंगली प्राण्यांना म्हणजे वाघ, सिंह, चित्ते, बिबटे, जंगली मांजरांना प्राणीसंग्रहालयात विविध परफ्युम किंवा सेंट्स लावून येणाऱ्या प्रेक्षकांच्या सुगंधाची चटक लागली आहे. त्यामुळे अखेर प्राणिसंग्रहालय प्रशासनाने लोकांना जुने, न वापरातले परफ्युम्स किंवा सेंट भेट म्हणून द्यावेत असे आवाहन केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार या प्राणीमात्रांना कोणतेही परफ्युम पसंत नाहीत तर त्यांना ब्रांडेड परफ्युम अधिक भावत आहेत. परफ्युमचा सुगंध आला नाही तर हे प्राणी दिवसभर सुस्त पडून राहत असल्याचे समजते. प्राणी संग्रहालय प्रमुख माईक वुलहॅम सांगतात, आम्ही त्यांना २४ वेगवेगळ्या प्रकारचे परफ्युम सुंघविले पण त्यात केल्विन क्लेन चे ब्रांडेड परफ्युम या प्राण्यांना अधिक आवडले आहेत. सेंट शिवाय आफ्टरशेव लोशनचा सुगंधही वाघ सिंहना आवडला आहे. त्यातही ऑब्सेशन फॉर मेन त्यांचा सर्वात आवडीचे असल्याचे दिसून आले आहे. यामुळे येथे येणाऱ्यांनी जुने सेंट भेट म्हणून द्यावेत असे आवाहन केले गेले आहे.

Leave a Comment