६ मार्चला अजित पवार सादर करणार अर्थसंकल्प


फोटो महाराष्ट्र टाईम्स
महाराष्ट्र राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २४ फेब्रुवारीपासून मुंबईत होत असून हे अधिवेशन १८ दिवसांचे आहे. यात ६ मार्च रोजी राज्याचा वार्षिक अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री अजित पवार सादर करणार आहेत. सकाळी ११ वा. हा अर्थसंकल्प विधानसभेत अजित पवार सादर करतील तर विधान परिषदेत राज्यमंत्री शंभूराजे भोसले अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

आजपर्यंतच्या प्रथेप्रमाणे राज्याचा अर्थसंकल्प दुपारी दोन वाजता सादर होत असे मात्र महाविकास आघाडीने सकाळी ११ वा. अर्थसंकल्प सादर करण्याची नवी प्रथा सुरु केली आहे. त्यानंतर ७ ते १० मार्च विधानसभा बंद राहणार आहे.

विरोधी भाजपने बजेट सत्रात स्वातंत्रवीर सावरकर यांचा मुद्दा लावून धरण्याची रणनीती आखली असल्याचे सांगितले जात असून २६ फेब्रुवारीला विधानसभेत ते स्वातंत्रवीर सावरकर गौरव प्रस्ताव आणतील असे समजते. अर्थात हा प्रस्ताव स्वीकारायचा का नाकारायचा हा अधिकार सभापती नाना पटोले याना असल्याचेही सांगितले जात आहे.

Leave a Comment