पाक पंतप्रधान इम्रान खान यांच्या पगारात घर चालणे अवघड


फोटो सौजन्य वीओन न्यूज
पाकिस्तान मध्ये सध्या रुपयाचे मूल्य घसरलेले आणि त्यामुळे गगनाला भिडलेली महागाई अशी परिस्थिती असून पंतप्रधान इम्रान खान याना जो पगार मिळतो त्यात एखाद्या कुटुंबाचा घरखर्च चालणे शक्य नसल्याचे म्हटले जात आहे. विशेष म्हणजे खुद्द पंतप्रधानांनी व्यापाऱ्यांबरोबर कर भरण्याचे महत्व याविषयी झालेल्या बैठकीत ही माहिती दिली आहे.

वीऑन न्यूज चॅनलने या संदर्भात पंतप्रधान इम्रान खान यांची पे स्लीप सादर केली आहे. त्यात इम्रान यांची ग्रॉस सॅलरी २,०१,५७४ असून कर वजा जाता त्यांच्या हातात पडणारी रक्कम आहे १.१९,९७९ पाकिस्तानी रुपये. इम्रान यांनी व्यापारी तसेच पाकिस्तानातील विरोधी पक्ष नेते करचुकवेगिरी करत असल्याचा आरोप केला असून कर भरण्याचे महत्व व्यापारी लोकांना समजावण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जात आहे.

पाकिस्तान मध्ये महागाई प्रचंड वाढली असून गहू ८० रुपये किलो, साखर १०० रुपये किलो झाली आहे. त्याचबरोबर डाळी, तांदळाचा भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे एका कुटुंबाला एक वेळचे जेवण घेणेही दुरापास्त बनले आहे. गेल्या १२ वर्षात यंदा सर्वाधिक महागाई असून गरीब जनतेला या महागाईला तोंड देऊन जीव जगविण्यासाठी कसरत करावी लागते आहे.

Leave a Comment