केजरीवाल आणि व्हेलेंटाईन डे असे जुळले नाते


फोटो सौजन्य इंडिया टाईम्स
सोमवरी दिल्ली विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल जाहीर होऊन अरविंद केजरीवाल यांच्या आपने स्पष्ट बहुमत मिळविले असल्याने अरविंद केजरीवाल तिसऱ्यावेळी मुखमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. हा शपथविधी १४ फेब्रुवारीला होईल असे सांगितले जात असून त्यानिमित्ताने केजरीवाल आणि जगभर साजरा होणारा प्रेमाचा उत्सव व्हेलेन्टाईन्स डे चे एक अजब नाते समोर आले आहे.

२०१३ आणि २०१५ च्या दिल्ली विधानसभा निवडणुका व्हेलेंटाईन डे शी जोडल्या गेल्या असून आता २०२०ची निवडणूकही त्याचा मार्गाने जाईल अशी लक्षणे आहेत. २०१२ मध्ये आम आदमी पार्टीची स्थापना झाल्यावर पहिलीच निवडणूक आली ती २०१३ ची. त्यात आपने २८ जागा जिंकल्या पण भाजपने ३१ जागा जिंकल्याने त्रिशंकू परिस्थिती उद्भवली होती. तेव्हा केजरीवाल यांनी कॉंग्रेसशी हातमिळवणी करून सरकार स्थापन केले पण ते फेब्रुवारीत कोसळले तो दिवस होता १४ फेब्रुवारी २०१४. कॉंग्रेसने बाहेरून पाठींबा दिला असल्याने केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता.

त्यानंतर राष्ट्रपती शासन लागू झाले आणि पुन्हा १२ जानेवारी २०१५ ला निवडणुका जाहीर झाल्या. त्यावेळी पक्षाचे नेते राघव चढ्ढा यांनी केजरीवाल दिल्लीचे व्हेलेंटाईन बनतील आणि रामलीला मैदानावर १४ फेब्रुवारीला शपथ घेतील असे जाहीर केले होते. त्याप्रमाणे आप पक्षाने ७ फेब्रुवारीला झालेल्या मतदानात ६७ जागा मिळवून निर्विवाद बहुमत मिळविले आणि १४ फेब्रुवारीला केजरीवाल यांनी रामलीला मैदानावर मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. २०१८ ला सरकारच्या तिसऱ्या वर्धापनदिनाचा सोहळा झाला तो १४ फेब्रुवारीलाच.

आता पुन्हा एकदा ६२ जागा मिळवून आपने निर्विवाद बहुमत मिळविले आहे. त्यामुळे यावेळी ते १४ फेब्रुवारीलाच शपथ घेतील असा अंदाज व्यक्त होत आहे.

Leave a Comment