ऑस्करमध्ये सिंगर जेनेल मोनेचा खास अंदाज


फोटो जेन्ट न्यूज
नुकत्याच पार पडलेल्या ऑस्कर सोहळ्यात अनेक सेलेब्रिटी खास अंदाजात रेड कार्पेट वर उतरल्या आणि उपस्थितांनी त्यासंदर्भात यथायोग्य चर्चाही केली पण यंदा सर्वाधिक चर्चेत आली सिंगर जेनेल मोने. तिच्या परफॉर्मन्सनेच कार्यक्रमाची सुरवात झाली आणि जेनेल तिचा गाऊन आणि दागिने यामुळे एकदम सगळ्याच्या नजरेत भरली.

जेनेलने या वेळी घातलेल्या गाऊनवर चक्क १ लाख ६८ हजार क्रिस्टल जडविले गेले होते आणि हे बहुतेक सर्व काम हाताने केले गेले होते. चंदेरी रंगाच्या या शिमरी ड्रेसला ५ कोटी रुपये किमतीच्या महागड्या दागिन्यांची जोड दिली गेली होती. त्यात व्हाईट गोल्ड बरोबर फॉरेव्हर डायमंड ज्युवेलरी समाविष्ट होती.

३४ वर्षीय जेनेलसाठी हा खास ड्रेस रोल्फ लॉरेनने डिझाईन केला होता, हिऱ्याचा नेकपीस, फिंगर रिंग ६० कॅरेट फॉरेव्हरमार्क डायमंड पासून बनविले गेले होते. त्याची किंमत ५ कोटी असल्याचे समजते. गळ्यातील छोकर १८ कॅरेट हिऱ्याचा, हातात ७ कॅरेटची अंगठी,, डायमंड सेट ४.३१ कॅरेटचा तर डायमंड एटरनीटी बँड १८ कॅरेटचा होता. जेनेलच्या मेकअप मध्येही सिल्व्हर थीम वापरली गेली होती. मेकअप आर्टिस्ट जेसिका स्मॉल्सने ही जबाबदारी पार पाडली होती.

Leave a Comment