उ .कोरीयाच्या किम जोंग उनचे बहिणीसाठी वरसंशोधन


फोटो सौजन्य पत्रिका
उत्तर कोरियाचा तानाशाह किम जोंग उन या ना त्या निमित्ताने नेहमीच चर्चेत असतो. सध्या तो बहिण किम यो जोंग हिच्यासाठी करत असलेल्या वरसंशोधनामुळे चर्चेत आहे. आपल्या बहिणीला योग्य जोडीदार मिळावा यासाठी त्याने जणू स्वयंवर थाटले आहे. अर्थात यात सहभागी होणाऱ्या इच्छुक वरांना काही अटी पूर्ण कराव्या लागणार आहेत. योग्य वर मिळाला तर त्याला सोन्याची चमकदार कार आणि १ कोटीचा हुंडा किम जोंग उन देणार असल्याचे त्याने जाहीर केले आहे. द. सनने या संदर्भातील बातमी दिली आहे. त्यानुसार किमची सर्व अधिकारी योग्य वरचा शोध घेऊ लागले आहेत.

किम जोंग उनची उपवर बहिण किं यो जोंग उत्तर कोरीयातील सर्वात पॉवरफुल महिला म्हणून ओळखली जाते. किमची प्रचार प्रमुख म्हणून ती काम करतेच पण अनेक महत्वाच्या बाबीत तिचा सल्ला किम मानतो. ती सतत किमच्या बरोबर असते. असे सांगतात की ती कॉलेज मध्ये पदवी शिक्षण घेत होती तेव्हा कॉलेजच्या आवारात तिचे पाउल पडताच तिला सर्व विद्यार्थी, शिक्षक वाट मोकळी करून देत असत. इतकेच नवे तर फिरत्या जिन्यावरून ती जात असेल तर जिन्यावर अन्य कुणी पाउल टाकत नसे.

अश्या या पॉवरफुल बहिणीसाठी किमला योग्य जोडीदार हवाय. त्यासाठीची पहिली अट म्हणजे त्याचे पूर्वी एकही अफेअर झालेले असता कामा नये. तो ५.१० इंचापेक्षा अधिक उंच नको, त्याचे पदवीचे शिक्षण प्योंगयोंग विद्यापीठातून झालेले असावे. त्याचे वजन ७५ किलो पर्यंत चालेल पण त्याला सिक्स पॅक अॅब्ज असले पाहिजेत. भविष्यात त्याला राजकारणात काम करावे लागेल आणि त्याला लष्करी कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे.

विशेष म्हणजे किमने बहिणीसाठी २०१२ मध्येही असेच स्वयंवर भरविले होते पण त्यातून अपेक्षित अनुरूप जोडीदार मिळू शकला नव्हता.

Leave a Comment