‘सत्यमेव जयते’मध्ये चक्क तिहेरी भूमिकेत दिसणार जॉन अब्राहम?


सध्या अभिनेता जॉन अब्राहमची मुख्य भूमिका असलेल्या ‘सत्यमेव जयते’ या चित्रपटाच्या सिक्वेलचे शूटिंग सुरू आहे. पहिल्या भागाच्या यशानंतर निर्मात्यांनी या चित्रपटाचा दुसरा भाग तयार करण्याचा निर्णय घेतला होता. पण, जॉन अब्राहम या चित्रपटात दुहेरी नाही तर, चक्क तिहेरी भूमिकेत दिसणार असल्याची शक्यता काही दिवसांपासून चर्चा रंगली होती. यावर आपले मत जॉनने स्पष्ट केलं आहे.

जॉनने याबाबत एका माध्यमाच्या मुलाखतीत सांगितले, की पहिल्या भागापेक्षा फार वेगळ्या रुपात हा चित्रपट रिलीज केला जाणार आहे. खूप मोठा प्रेक्षकवर्ग असणाऱ्यांसाठी पहिला चित्रपट हा होता. पण हा चित्रपट यावेळी काही महत्वांच्या मुद्यांवर प्रकाश टाकत विशेष व्यक्तींपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

तिहेरी भूमिकेबाबत तो म्हणाला, की अद्याप काही पात्रांवर या चित्रपटाचे दिग्दर्शक मिलाप झवेरी काम करत आहेत. मी इतरही भूमिकेमध्ये दिसू शकतो. पण, यावर कोणतेही शिक्कामोर्तब झालेले नाही. ज्यावेळी असे काही असेल, त्यावेळी त्याची घोषणा केली जाईल. ‘सत्यमेव जयते’ हा चित्रपट गांधी जयंती म्हणजे २ ऑक्टोंबरला रिलीज होणार आहे.

Leave a Comment