भाजी विक्रेत्याच्या मुलीची या परिक्षेत बाजी

कर्नाटक येथील एका भाजी विक्रेत्याच्या मुलीने सर्वाधिक गुण मिळवत एअरोनॉटिकल इंजिनिअरिंगची परिक्षा पास केली आहे. 22 वर्षीय आर. ललिता कर्नाटकच्या विश्वेश्वराय टेक्नोलॉजी यूनिवर्सिटीमधून एअरोनॉटिकल इंजिअरिंगमध्ये गोल्ड मेडलसह पास झाली आहे.

नॉबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी यांनी देखील तिला भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

ललिता आपल्या कुटंबातून पदवी मिळवणारी पहिली आहे. तिचे कुटुंब मागील अनेक वर्षांपासून भाजी विकण्याचे काम करत आहे. ललिताने आपल्या मेहनतीच्या जोरावर परिक्षेत 9.7 पर्सेंटाईल गुण मिळवले.

ललिता रोज सकाळी 3-4 वाजता उठते. भाजी विकण्यास आई-वडिलांना मदत करते. बंगळुरूच्या ईस्ट वेस्ट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला जाण्याआधी दुकानावर बसून अभ्यास करते.

तिचे वडील पहिली आणि आई पाचवीपर्यंत शिकलेली आहे. दोघेही दुकान सांभाळतात. 22 वर्षीय ललिता 2015 मध्ये पहिल्यांदा बंगळुरूला आली होती. नॅशनल स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राममध्ये निवड झाल्यानंतर ती आता एका एअरोस्पेस कंपनीत इंटर्नशिप करत आहे.

Leave a Comment