येथे तयार होत आहे जमिनीपासून 15 मीटर खाली वॉर मेमोरियल

झारखंडची राजधानी रांची येथील सर्क्युलर रोडवरील भगवान बिरसा मुंडा स्मृती पार्क येथे वॉर वॉर मेमोरियल तयार करण्यात येत आहे. जमिनीपासून 15 मीटर खाली जवळपास 3600 वर्गमीटरमध्ये पसरलेल्या या वॉर मेमोरियलची संरचना राष्ट्रीय स्तरावरील असेल. बाहेरून पाहताना हे एक समतल गौलाकार मैदान दिसेल, मात्र तुम्ही तेथे ग्लायवर 15 मीटर खाली जाऊन वॉर मेमोरियल पाहू शकाल. आतील बाजूला झारखंडच्या शहीदांची गाथा तुम्हाला पहायला मिळेल.

हे स्मारक बांधण्यासाठी जवळपास 62 कोटी रुपये खर्च येणार आहे. पार्कमध्ये 8 कोटींचे म्यूझिकल वॉटर फाउंटेन लावले जाणार आहे. बिरसा मुंडा पार्कला पर्यटन स्थळ म्हणून विकसित केले जाणार आहे. येथे अंडरग्राउंड पार्किंग, रेस्टोरेंट आणि फूड कोर्ट देखील बनणार आहे.

2013 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या आदेशावरून पार्कच्या नुतनीकरणाचे काम सुरु झाले होते. 42 लाख रुपये खर्च करून जेल परिसराला पार्कमध्ये विकसित करण्यात आले होते. मात्र सरकार आणि महानगर पालिकेमधील अधिकारी बदलल्याने या प्रोजेक्टसाठीचा खर्च 62 कोटींपर्यंत पोहचला.

Leave a Comment