दिल्ली विधानसभा निवडणुकीत सोशल मीडिया जाहिरातींवर झाले एवढे कोटी खर्च


नवी दिल्ली – सोशल मीडियावर दिल्ली विधानसभा निवडणुकीची सर्वाधिक चर्चा दिसून आली. या निवडणुकीत सोशल मीडियावर आम आदमी पक्ष, भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसने एकूण 1.99 कोटी रुपये खर्च केले आहेत. त्यात सर्वाधिक खर्च आप (92.16 लाख रुपये), भाजप आणि काँग्रेसने आप-आपल्या फेसबूक पेजवर खर्च केले आहेत. फेसबूकच्या अॅड लायब्ररी रिपोर्टमधून ही माहिती समोर आली. यामध्ये 7 जानेवारी ते 8 फेब्रुवारीपर्यंत कुठल्या पक्षाने किती खर्च केला याची ही आकडेवारी देण्यात आली आहे.

फेसबूकवर दिल्ली विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक खर्च करण्याच्या बाबतीत आपने बाजी मारली. या निवडणुकीत फेसबूकवर आपने 46.88 लाख रुपये खर्च केले आहेत. यात भाजप दुसऱ्या आणि काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर आहे. तरीही निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवस आणि आठवड्यात सर्वात जास्त खर्च भाजपने केला. 24 लाखांपेक्षा अधिकच्या जाहिराती भाजपने शेवटच्या आठवड्यामध्ये दिल्या आहेत.

7 जानेवारी ते 8 फेब्रुवारी दरम्यान दिल्लीत फेसबूकवर 1.99 कोटी रुपयांच्या जाहिराती देण्यात आल्या आहेत. तर शेवटच्या आठवड्यात अर्थात 2 ते 8 फेब्रवारी दरम्यान 78 लाख रुपयांपेक्षा अधिकच्या जाहिराती देण्यात आल्या. शेवटच्या आठवड्यात सर्वाधिक जाहिराती देणाऱ्या भाजपने दिल्ली भाजप फेसबूक पेजवरून 24.05 लाख रुपयांच्या जाहिराती दिल्या. याच दरम्यान आपने 6.05 लाख आणि दिल्ली काँग्रेसने 2.22 लाख रुपये जाहिरातींवर खर्च केले आहेत.

Leave a Comment