टाटा स्कायच्या या ऑफर अंतर्गत मोफत पाहता येणार व्हिडीओ

डीटीएच ऑपरेटर टाटा स्कायने आपली एसडी सेटटॉप बॉक्स सेवा बंद करत ग्राहकांना मोठा झटका दिला होता. मात्र आता कंपनीने ग्राहकांसाठी एक खास ऑफर आणली आहे. या ऑफरचे नाव Jingalala Appiness असे आहे. ही ऑफर सर्व स्बस्क्राईबर्ससाठी आहे.

या ऑफर अंतर्गत कंपनी आपल्या टाटा स्काय मोबाईल अ‍ॅपच्या कंटेंटला मोफत उपलब्ध करत आहे. ही मर्यादित काळासाठी ऑफर असून, केवळ टाटा स्काय मोबाईल अ‍ॅपसाठीच ही ऑफर लागू आहे. या ऑफरचा लाभ 11 फेब्रुवारी ते 17 फेब्रुवारीपर्यंत घेता येईल.

टाटा स्काय मोबाईल अ‍ॅपमध्ये मोफत कंटेट उपलब्ध केला जाईल. यामध्ये 5000 पेक्षा अधिक टायटल्स, 400 पेक्षा अधिक लाईव्ह टिव्ही चॅनेल्ससह अन्य कंटेटचा समावेश आहे. व्हिडीओ ऑन डिमांड आणि मूव्हिज ऑन डिमांड या ऑफरचा भाग नसतील. या ऑफर अंतर्गत टाटा स्काय सेवेला अ‍ॅपवर डिस्काउंटमध्ये उपलब्ध केले जात आहे.

दरम्यान, काही दिवसांपुर्वीच कंपनीने आपली एसडी सेटटॉप बॉक्स सेवा बंद केली असून, कंपनीने आपल्या वेबसाईटवरून देखील एसडी सेटटॉप बॉक्स काढून टाकले आहेत. आता ग्राहक केवळ टाटा स्काय बिंज+, टाटा स्काय एचडी, टाटा स्काय 5के आणि टाटा स्काय+ एचडी हे सेटटॉप बॉक्स घेऊ शकतात.

Leave a Comment